Alia Bhatt Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्टला कुणीतरी करतंय 'मिस'; सोशल मीडियावरील पोस्टवर केली कमेंट

आलिया भट्टने तिच्या पहिल्या हॉलिवूड प्रोजेक्ट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण केले आहे. तिने सह-अभिनेत्री आणि 'वंडर वुमन' फेम गॅल गॅडोटसोबत एक सेल्फी शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart of Stone)चं शूटिंग पूर्ण झालं आहे. आलियानं शूटिंग संपल्यानंतर चित्रपटाच्या सेटवरील फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिनं हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिली आहे. तसंच या पोस्टवर तिच्यासाठी खास असणाऱ्या व्यक्तीनं कमेंट केली आहे. आलियाला देखील कुणीतरी स्पेशल व्यक्ती मिस करतेय, असं या कमेंटवरून दिसतंय.

आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनं हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर करून एक सुंदर अशी कॅप्शन लिहिली आहे. यातला एक फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका फोटोत आलिया 'वंडर वुमन' फेम गॅल गडॉटला मिठी मारताना दिसत आहे. हा सेल्फी गॅल गडॉटने स्वतः क्लिक केला आहे.

आलिया भट्टने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये 'हार्ट ऑफ स्टोन' टीमच्या काही महिला कलाकारांसमवेत ती पोझ देताना दिसत आहे. दुसर्‍या चित्रात, खुर्चीवर 'हार्ट ऑफ स्टोन' लिहिलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलियाने चित्रपट आणि त्याविषयीच्या मनातल्या भावना शेअर केल्या आहेत.

आलियाने हे फोटो इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर करत 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटावर माझे खूप प्रेम आहे. गॅल गॅडॉट तुझे खूप आभार...माझे दिग्दर्शक टॉम हार्पर...जेमी डोरमन आज तुमची आठवण येते... आणि एका अविस्मरणीय अनुभवासाठी संपूर्ण टीमचे आभार. मला तुम्ही दिलेलं प्रेम, माझी घेतलेली काळजी याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन', असे तिनं म्हटलं आहे.

आलिया भट्टने पुढे लिहिले, ' मी तुम्हा सर्वांना आपल्या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहे, पण सध्या मी घरी जाते आहे'. आलिया भट्टच्या मेसेजवरून असे दिसते की ती घरी परत येण्यासाठी आणि पती रणबीर कपूरला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे.

गॅल गॅडोट देखील आलियाला खूप मिस करत आहे. आलिया भट्टच्या पोस्टवर गॅल गॅडोटने कमेंट केली, 'आम्ही तुला खूप मिस करत आहोत', असे ती म्हणतेय. गॅल गॅडोटबरोबर आलियाची आई सोनी राजदान यांनी 'तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसत आहात. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही वाट बघत आहोत', अशी कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तसेच या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone In Toilet: तुम्हाला टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील'हे' गंभीर परिणाम

Government Taxi Service: राज्यात लवकरच सुरू होणार सरकारी रिक्षा-टॅक्सी सेवा; Ola, Uber ला देणार टक्कर

Priyanka Gandhi: पहलगाम हल्ल्यावरून लोकसभेत गदारोळ; प्रियंका गांधींचा अमित शहांवर जोरदार हल्ला, म्हणाल्या... VIDEO

Weather Update: श्रावणात रंगणार ऊन-पावसाचा खेळ; पावसाची १५ दिवस सुट्टी

McDonalds Buisness : मॅकडोनाल्ड्सवर संसदेत बंदी घालण्याची मागणी; प्रसिद्ध कंपनीचा व्यवसाय किती कोटींचा आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT