Mahesh Bhatt
Mahesh Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Bhatt Health News: ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर शस्त्रक्रिया, मुलानं दिली महत्वाची अपडेट...

Chetan Bodke

Mahesh Bhatt: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक महेश भट नुकतेच यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महेश भट्ट यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबत भट्ट कुटुंबिय चिंतेत होते. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मुलगा राहुल भट्ट याने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच महेश भट्ट यांची प्रकृती थोडी खराब झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. प्रकृती अस्वस्थानंतर त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच महेश भट्ट यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेची बातमी समोर आल्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

राहुल भट्ट यांनी सांगितले की, महेश भट्ट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना डिस्चार्ज दिला असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. असेही त्यांनी सांगितले. सोबतच मी त्यांच्या प्रकृतीविषयी आत्ताच अधिक तपशील देता येणार नाही, कारण हॉस्पिटलमध्ये जास्त लोकांना जाण्याची परवानगी नव्हती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश भट्ट यांनीही आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. या प्रक्रियेला शस्त्रक्रिया म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शस्त्रक्रियेत चाकू वापरला जातो. अँजिओप्लास्टी ही एक साधी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेला अवघा काही वेळच लागतो. 16 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी महेश भट्ट यांना 18 जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात इंडिया आघाडीची बैठक सुरू, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक

Live In Relationship: मुस्लिमांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार नाही: हायकोर्ट

Ramdas Athawale: काँग्रेसने माझी ती मागणी कॉपी केली, रामदास आठवले इंडिया आघाडीवर कडाडले

Jake Fraser McGurk: ४,४,४,६,४,६..वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या फलंदाजाचा दिल्लीत राडा

Mumbai News : रोकड घेऊन जाणारी कॅश व्हॅन नाक्यावर थांबवली अन् सापडलं घबाड; निवडणुकीआधी पवई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT