Jake Fraser McGurk: ४,४,४,६,४,६..वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या फलंदाजाचा दिल्लीत राडा

DC vs RR, Jake Fraser-McGurk: दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार फलंदाज जॅक फ्रेजर मॅकगर्कची बॅट चांगलीच तळपतेय. या फलंदाजाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा तो विरोधी संघातील गोलंदाजांवर तुटून पडला आहे.
Jake Fraser McGurk scored fiery fifty in ipl 2024 against rajasthan royals amd2000
Jake Fraser McGurk scored fiery fifty in ipl 2024 against rajasthan royals amd2000twitter

दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार फलंदाज जॅक फ्रेजर मॅकगर्कची बॅट चांगलीच तळपतेय. या फलंदाजाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा तो विरोधी संघातील गोलंदाजांवर तुटून पडला आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने १९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार खेचत आपलं वादळी अर्धशतक पूर्ण केलं. हे आयपीएल २०२४ स्पर्धेतील त्याचं चौथं अर्धशतक ठरलं आहे. यासह त्याने या हंगामात ३०० धावांचा पल्ला देखील गाठला आहे.

जॅक फ्रेजर मॅकगर्कने या स्पर्धेत फलंदाजी करताना २५० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. दिल्लीसाठी सलामीला येत त्याने २० चेंडूंचा सामना केला आणि ३ षटकार आणि ७ चौकांरांच्या मदतीने ५० धावा केल्या आहेत. त्याला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र तेव्हाच आर अश्विनने त्याला बाद करत माघारी धाडलं.

Jake Fraser McGurk scored fiery fifty in ipl 2024 against rajasthan royals amd2000
RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

आयपीएलमध्ये धुमाकूळ घालूनही त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ७ सामन्यांमध्ये ४४.१४ च्या सरासरीने ३० चौकार आणि २६ षटकारांच्या मदतीने ३०९ धावा केल्या आहेत.

Jake Fraser McGurk scored fiery fifty in ipl 2024 against rajasthan royals amd2000
Sanju Samson Fined: पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला दुहेरी धक्का! BCCI कडून संजू सॅमसनवर मोठी कारवाई

दिल्लीचा शानदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकअखेर २२१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने ८४ धावांची खेळी केली. मात्र राजस्थानचा संघ विजयापासून २० धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com