Celebrity Froud Saam TV
मनोरंजन बातम्या

Celebrity Fraud: सेलिब्रिटींची नावे वापरून होतेय लाखोंची फसवणूक; आलिया, ऐश्वर्यासह सचिनच्या नावाचाही समावेश

दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी आदींची नावे वापरून बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करण्यात येत आहे.

Pooja Dange

Celebrities Credit Card Fraud: बॉलिवूड कलाकार असोत किंवा स्टार क्रिकेट खेळाडू, चाहत्यांमध्ये त्यांची एक वेगळीच क्रेझ आहे. अनेकजण सेलिब्रिटींची नावे वापरतात. परंतु प्रत्येक वेळी या नावांचा चांगला वापर होईल असे होत नाही.

सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्यात येत आहे. सध्या अशा अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांना पकडण्यासाठी बराच वेळ जातो. आता या टोळ्यांच्या निशाणा बॉलीवूड कलाकार आहेत.

दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी आदींची नावे वापरून बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक करण्यात येत आहे. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीचे नाव समोर आले आहे.

या टोळीने एकूण 98 सेलिब्रिटींच्या नावाचा वापर केला आहे. तसे एकूण 90 लाखांहून अधिकची फसवणूक केली आहे. फक्त बॉलिवूड कलाकारच नाही तर एमएस धोनी, सचिन तेंडुलकर यांच्या अनेक खेळाडूंचा यात समावेश आहे. सैफ अली खान, हृतिक रोशन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचीही नावे या टोळीच्या यादीत समाविष्ट आहेत.

सेलेब्सच्या नावावर बनावट ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवली जात होती. ही टोळी सेलेब्सच्या नावावर बँकांकडून कर्ज घेते. ही फसवणूक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केली जाते. 23 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एफपीएल टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीचे प्रतिनिधी शेखावत यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. व्हर्च्युअल कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेखावत यांची २१.३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 25 बनावट आधार कार्ड, 40 क्रेडिट कार्ड, 10 मोबाईल, एक लॅपटॉप, 42 सिमकार्ड, 34 बनावट पॅनकार्डसह पाच चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. यातील एका आरोपीने बी.टेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. गेल्या 2 वर्षांत सुमारे 90 लाख रुपयांची फसवणूक या टोळीकडून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Madgaon Torism: पुण्याहून मडगावला निघालात? वाचा रेल्वे, बस आणि फ्लाइटचे संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: बॉम्बब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, या देशामध्ये बरंच चुकीचं घडतंय - यशोमती ठाकूर

Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील त्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र; २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

Maharashtra Tourism: सातारापासून हाकेच्या अंतरावर आहेत 'ही' सुंदर ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT