Khadaan Web series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khadaan: सत्य उलगडण्यासाठी तुम्ही किती दूर जाल? 'खदान' वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Khadaan Web series : हंगामा या ओटीटी माध्यमावर १९ मार्च २०२५ रोजी "खदान" ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. भयानक भूतकाळाने पछाडलेल्या गावातील गूढ या वेबसिरीज मधून उलगडणार.

Shruti Vilas Kadam

Khadaan Web series : भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटी १९ मार्च २०२५ रोजी आणखी एक बहुप्रतिक्षित वेबसिरीज घेऊन आली आहे. "खदान" हंगामा ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. यात अली गोनीसह करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद मुख्य भूमिकेत झळकतायेत. हंगामा ओटीटीवर प्रसारित झालेली ही मालिका एक रोमांचक थ्रिलर दिसते जी सस्पेन्स आणि अॅक्शन यांचं मिश्रण आहे.

भयानक भूतकाळाने पछाडलेल्या खाण गावात इन्स्पेक्टर वीर प्रताप सिंग (अली गोनी) शांततेच्या शोधात येतो, पण इथे येऊन तो एका वेगळ्याच पेचात फसला जातो. गावात एका संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या झाल्याचे आढळून येते, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या हत्येचा सूड घेण्यासाठी आत्मा परत आली आहे का? गावाला दीर्घकाळापासून असलेला शाप पुन्हा लागला आहे का? तपासादरम्यान सापडलेल्या शेकडो मृतदेहांमागे कोण आहे? वीर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोध असताना, तोच रहस्य आणि फसवणुकीच्या जाळ्यात खोलवर ओढला जातो. प्रत्येक रहस्य उलगडताना दंतकथा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट होत जातात, यामुळे एक सत्य समोर येते जे त्याच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलतो.

अली गोनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना मूळ मालिकेत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “खदानमध्ये वीर प्रताप सिंगची भूमिका साकारणे खरोखरच खास आणि माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या भूमिकेमुळे मी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हॉरर-थ्रिलर शैलीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधीही साकारली नव्हती. हा सिरीज खरोखरच आकर्षक आहे. मला पटकथा वाचण्यापासून ते शूटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खूप आवडली. ही, कथा नक्कीच गुंतवून ठेवणारी असून मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल”.

आपल्या खदानमधील भूमिकेबद्दल बोलताना करणवीर बोहरा म्हणाले, अशा प्रकारची भूमिका पडद्यावर साकारणे खरंच आव्हानात्मक असते, आणि मला ते आवडते. खदानमध्ये एका कथेत अनेक परस्पर कथा विणलेल्या आहेत. प्रत्येकाचा स्वत:चा संघर्ष आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव आहेत. प्रत्येक पात्र या प्रवासात स्वतःचे सत्य शोधण्यासाठी त्यांच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करतात हे पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता आणि मला आशा आहे की प्रेक्षक आम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक करतील," असे ही अभिनेता पुढे म्हणाले.

आज १९ मार्च २०२५ रोजी हंगामा ओटीटी वर प्रदर्शित होणारा 'खादान' हा शो पाहायला विसरू नका. सर्व भाग पाहण्यासाठी आजच हंगामा अॅप डाउनलोड करा. ही मालिका आता हंगामा आणि टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही यासारख्या भागीदार प्लॅटफॉर्मवर केवळ स्ट्रीम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT