Mirzapur Season 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur Season 3: भावनिक पोस्ट शेअर करत अली फझलने सांगितला 'मिर्झापूर 3'चा अनुभव

भारतातील गाजलेली वेबसीरीज पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

Pooja Dange

Ali Fazal And Mirzapur 3 Update: मनोरंजन विश्वास एक काळानुसार बदल होताना दिसत आहेत. पूर्वी प्रेक्षकांना चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता असायची. परंतु आता आहे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता प्रेक्षक वेबसीरीज आणि त्यांचे सिक्वल कधी प्रदर्शित होणार याची प्रतिक्षा करत असतात. अमेझॉन प्राईमवरील गाजलेली वेबसीरीज म्हणजे 'मिर्झापूर'. 'मिर्झापूर' वेबसीरीजचा तिसरा भाग कधी पूर्ण होणार याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. प्रेक्षकांना लवकरच ही वेबसीरीज पाहता येणार आहे. याची माहिती 'मिर्झापूर' वेबसीरीजमधील कलाकार अली फझल याने दिली आहे.

भारतातील सर्वात प्रसिद्ध वेबसीरीज म्हणजे 'मिर्झापूर'. मिर्झापूरच्या दोन्ही सीझनला प्रचंड यश मिळाले. आता निर्मात्यांनी सीझन 3 ची तयारी पूर्ण केली आहे. वेबसीरीजमधील मुख्य अभिनेता अली फजलने याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'मिर्झापूर 3' च्या शुटिंग रॅप अपचा आहे. ज्यामध्ये अलीसह वेबसीरीजमधील सर्व स्टार कास्ट आणि क्रू सदस्यांसह संपूर्ण टीम उपस्थित आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अली फजलने लिहिले आहे की, 'हा संदेश माझ्या संपूर्ण टीमसाठी आहे, मिर्झापूर 3 चा प्रवास माझ्यासाठी खूप छान आणि अद्भुत होता. (Web Series)

मागील दोन्ही सीजनप्रमाणे या वेळीही मी नवा अनुभव घेतला आहे. मी आणि गुड्डू पंडित सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडून काही न काही शिकण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला माहीत असायला हवे. जेणेकरुन तुम्ही जे पाहता त्याचा तुम्हाला आनंद लुटता येईल, 'मिर्झापूर 3'साठी केलेल्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व इट्स रॅप बोलत आहेत.

'मिर्झापूर 3'चे शूटिंग तर संपले आहे. आता चाहते ही वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत. अली फजलच्या या रॅप अप व्हिडिओने चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे. 'मिर्झापूर 3' पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. (OTT)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT