Albatya Galbatya Film Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Albatya Galbatya Film: “किती गं बाई मी हुश्शार…”; रुपेरी पडद्यावर येणार 'अलबत्या गलबत्या' चित्रपट, थ्रीडीमध्ये बच्चेकंपनीला घेता येणार अनुभव

Albatya Galbatya Film Announcement: चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ नाटकानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येतोय. नुकतंच निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषण केली आहे.

Chetan Bodke

Albatya Galbatya Film Announcement

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. हे बालनाट्य ७०च्या दशकातील आहे. या नाटकाने रंगभूमीवर चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. या नाटकामध्ये असलेल्या चिंची चेटकिणीचे पात्र ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारले होते.

त्यानंतर काही वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या रुपात नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यावेळी झी प्रस्तुत आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ नाटकात अभिनेता वैभव मांगलेने चिंची चेटकिणीचे पात्र साकारले होते.

आता त्या नाटकानंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येणार आहे. रंगभूमीवर धुमाकूळ घातल्यानंतर "अलबत्या गलबत्या" हा चित्रपट थ्रीडी अंदाजामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याची जबाबदारी घेतली आहे. अभिनेता वैभव मांगले या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे. "अलबत्या गलबत्या" या नाटकाचा आता चित्रपट होणार असल्यामुळे चाहते चित्रपटाबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. चित्रपटामध्ये, अभिनेता वैभव मांगलेने चिंची चेटकिणीचे पात्र साकारले आहे.

तो या टीझरमध्ये, “किती गं बाई मी हुश्शार… किती गं बाई मी हुश्शार” असं म्हणताना तो दिसतोय. नाटकांतही, अभिनेता वैभव मांगलेने चिंची चेटकिणीचे पात्र साकारले होते.

नाटकानंतर चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाला अत्याधुनिक व्हिएफक्सचीही जोड दिली जाणार आहे. थ्रीडी स्वरुपात हा चित्रपट असल्यामुळे बच्चेकंपनीला या चित्रपटाचा एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे. "अलबत्या गलबत्या" चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर ॲरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT