Akshaye Khanna Saam
मनोरंजन बातम्या

Akshaye Khanna: 'सीन सुरू झाला अन् तो नाचू...'; 'धुरंधर' मधला अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स कोरिओग्राफ नव्हता, वाचा 'तो' किस्सा

Akshaye Khanna: धुरंधरमधील अक्षय खन्नाचा डान्स व्हायरल होत आहे. सर्वजण त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. आता, त्याच्या सह-कलाकाराने खुलासा केला आहे की हा सीन चित्रपटात नव्हताचं.

Shruti Vilas Kadam

Akshaye Khanna Viral Dance: गेल्या काही दिवसांपासून धुरंधर हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ज्या व्यक्तीची सर्वाधिक चर्चा झाली आहे तो म्हणजे अक्षय खन्ना. अक्षयच्या डान्सिंग एंट्रीमुळे खूप चर्चा होत आहे आणि त्या सीनचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चित्रपटात अक्षयच्या भावाची भूमिका करणाऱ्या दानिशने खुलासा केला की अक्षयने तो सीन स्वत: इम्प्रूव्ह केले होते. ते पटकथेचा भाग नव्हता.

अक्षयने काय केले

दानिशने गाण्यात अक्षयने त्याचा एंट्री सीन कसा इम्प्रूव्ह केला हे सांगितले. दानिश म्हणाला, "आम्ही हा सीन लेह-लडाखमध्ये शूट केला आणि विजय गांगुली गाण्याचे कोरिओग्राफ करत होते. आम्ही सर्वांनी ते ट्रॅक ऐकले आणि ते खूप आवडले. तेव्हा आदित्य सर अक्षय सरांना सीन समजावून सांगत होते. संपूर्ण कोरिओग्राफी व्यवस्थित झाली होती आणि मग अक्षय सरांनी आदित्यला विचारले की मी नाचू शकतो का. आदित्य सर म्हणाले, 'तुम्हाला जे करायचे ते करा.'

सर्वजण आश्चर्यचकित झाले.

दानिश पुढे म्हणाला, "यानंतर, एक टेक घेण्यात आला आणि आम्ही सर्वांनी एन्ट्री घेतली. त्याने सर्वांना नाचताना पाहिले आणि नंतर अक्षय स्वतः नाचू लागल कोणतीही कोरिओग्राफी नव्हती. त्यांनी जे केले ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. शूटनंतर लोकांनी खूप कौतुक केले; फ्रेम उत्तम दिसत होती. त्यांनी ते सर्व स्वतः केले. ते कमाल अभिनेते आहेत." हा डान्स सीक्वेन्स बहरीनच्या एका रॅपरने सादर केलेल्या हिप हॉप ट्रॅक FA9LA चा होता. अक्षयचा डान्स सीक्वेन्स व्हायरल झाल्यावर निर्मात्यांनी संपूर्ण गाणे रिलीज केले.

धुरंधर चित्रपट

धुरंधर बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे. रणवीर सिंग चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, दानिश आणि राकेश बेदी देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेबाहेर विद्यार्थ्यांचा जमाव

Maharashtra Politics: बेट्या जेवढं तुझं वय आहे ना..., भाजपचे माजी मंत्री आणि अजित पवारांच्या आमदाराचा एकमेकांवर जोरदार प्रहार

Animal Facts: कोणत्या प्राण्याला असतात ५ हृदय? उत्तर वाचून विश्वासच बसणार नाही

Chicken Chilli Recipe: घरी हॉटेल स्टाईल चिकन चिली कशी बनवायची?

प्रसिद्ध अभिनेत्याचा MMS व्हिडिओ व्हायरल? सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT