ott platform
ott platform Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ओटीटीवर धुमशान, 'ही' देखील वेबसीरीज तुफान चालते...

Chetan Bodke

OTT Release: २०२२ हे वर्ष बॉलिवूडने नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांनी जबरदस्त गाजवले. एकूण एक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. बॉलिवूडमधील मोजकेच चित्रपट आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवू शकले.

या वर्षात अक्षय कुमारचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. २०२२ हे वर्ष जरी त्याला निराशाजनक गेलं असलं तरी अक्षयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्याचा ‘कठपुतली’ हा चित्रपट गेल्या वर्षी ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट ठरला आहे.

‘ओरमॅक्स’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अजय देवगणची ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ ही वेबसीरिज आणि ‘कठपुतली’ हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिला होता. चित्रपटांच्या बाबतीत ‘कठपुतली’नंतर यामी गौतमी अभिनित ‘द थर्सडे’ चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

तर, विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत दीपिका पादुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाचाही समावेश अजूनही कायम आहे. हा चौथ्या क्रमांकावर असून कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.

जरी ही या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात असफल ठरले असतील तरी ही, ओटीटीवर या चित्रपटांनी आपली जादू दाखवली. ओटीटी २०२० पासून बराच चर्चेत आहे. ओटीटीवर प्रेक्षक चित्रपट आणि वेबसीरिज आवर्जून पाहतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT