Akshay Kumar Share Funny Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Funny Video : फ्रेंडशिप डेनिमित्त अक्षय कुमारची खास पोस्ट; 'क्या हुआ तेरा वादा'वर केला फनी डान्स

Akshay Kumar Share Video : अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Akshay Kumar Recreate Hera Pheri : अक्षय कुमार सध्या त्याच्या 'ओ माय गोड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. पण आज फ्रेंडशिप डे दिवशी देखील तो चर्चेत आहे.

अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मित्रांना त्यांच्या मैत्रीतील वचनाविषयी विचारत आहे. पाहूया नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये.

अक्षय कुमारने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने 'क्या हुआ तेरा वादा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. अक्षय कुमार त्याच्या मित्रांसोबत एक फनी व्हिडीओ बनवला आहे.

अक्षय कुमार आणि त्याचे काही मित्र विविध प्रॉप्स घेऊन डान्सचा आनंद घेत आहेत. अक्षय कुमारच्या हातात फ्लॉवर क्लीनिंग ब्रश आहे. तर त्याच्या एका मित्राच्या हातात फुलदाणी आहे. दुसऱ्याच्या हातात जिममधील मोठा बॉल आहे. यातून ते दोघे गळ्याला ताल देत आहेत. अक्षयचा आणखी एक मित्र हातात मुग्दल घेऊन त्याच माईकसारखा वापर करत आहे. अजून एकजण टाळ्या वाजून त्यांना साथ देत आहे. सगळेजण जोरजोरात गाणे गाऊन त्यावर डान्स करत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमारने याला कॅप्शन दिले आहे की, मित्रांसोबत मस्ती करण्यासारखे दुसरे सुख नाही... वय आणि परिस्थती काहीही असो, माझे मित्र नेहमीच माझ्यातील लहान मुल बाहेर काढतात. देव सर्वांना मैत्रीचा आनंद देवो. #फ्रेंडशिपडे' असं म्हणत त्याने फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Entertainment News)

अक्षय कुमार देखील या व्हिडीओमध्ये हातातील प्रॉप घेऊन गाणं गाताना आणि त्याच्या अंदाजात नाचताना दिसत आहे. हे सर्व बघून 'हेरा फेरी' चित्रपटाची आठवण नक्की येईल.

अक्षय कुमार यारो का यार आहे हे आपण अनेकदा पाहिलं आहे. अक्षय त्याच्या जुन्या मित्रांना अजूनही विसरलेला नाही. त्यांचे मित्र त्याच्यासोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Fraud Exposed : डॉक्टरांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा वापर, विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपयांना गंडा घातला

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत सरकारी नोकरी; मिळणार पगार १.५ लाख; अर्ज कसा करावा?

Office Politics: तुम्हीही ऑफिस पॉलिटिक्सला कंटाळलात? हे ७ मार्ग अवलंबवा, त्रास देणारे होतील दूर

Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घरावर गोळीबार | VIDEO

SCROLL FOR NEXT