Akshay Kumar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Akshay Kumar Sells Mumbai Property : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा प्रॉपर्टी विकून बक्कळ नफा मिळवला आहे. त्याने मुंबईतील बोरीवली येथील दोन अपार्टमेंट्स विकले आहेत.

Shreya Maskar

'हाऊसफुल 5' चित्रपट चांगलाच गाजला असून त्यांने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई देखील केली.

अक्षय कुमारने मुंबईतील बोरीवली येथील दोन अपार्टमेंट्स विकले आहेत.

अक्षय कुमार आपल्या लग्जरी प्रॉपर्टी विकून बक्कळ पैसा कमवत आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचा 'हाऊसफुल 5' चित्रपट चांगलाच गाजला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई देखील केली. अनेक काळापासून अक्षय कुमार आपल्या लग्जरी प्रॉपर्टी विकून बक्कळ पैसा कमवत आहे. आता यात अजून दोन प्रॉपर्टींची भर पडली आहे. सध्या चित्रपटांसोबतच अक्षय कुमार गुंतवणूकीमुळे देखील चांगलाच चर्चेत आहे.

अक्षय कुमारने मुंबईतील बोरीवली येथील दोन अपार्टमेंट्स विकले आहेत. ही लग्जरी अपार्टमेंट्स त्यांनी 7.10 कोटींना विकले आहेत. त्याला 90% पेक्षा जास्त ROI मिळाला आहे. या दोन्ही मालमत्ता मीडिया रिपोर्टनुसार, ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम प्रोजेक्ट स्काय सिटीमध्ये आहेत. हा 25 एकरचा परिसर आहे. रेडी-टू-मूव्ह प्रकल्प आहे.

अक्षय कुमार रिअल इस्टेट गुंतवणुकीतून करोडोंची कमाई करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोन्ही मालमत्ता जून 2025 मध्ये नोंदणीकृत झाल्या आहेत. 'स्काय सिटी'च्या प्रकल्पात 3 बीएचके, 3 बीएचके+स्टुडिओ, डुप्लेक्स अपार्टमेंटचा समावेश आहे. तसेच या मालमत्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहेत. त्यामुळे यांचे आकर्षण जास्त आहे. तसेच गोरेगाव, मालाड या कॉर्पोरेट हबसोबत कनेक्टिव्हिटी देखील आहे. तसेच येथे मेट्रो मार्ग देखील उपलब्ध आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,अक्षय कुमारने एक फ्लॅट 5.75 कोटींना विकला आहे. जो 1,101 चौरस फूट कार्पेट एरियाचा आहे. याला दोन कार पार्किंग देखील आहे. अक्षयने 2017 साली हा फ्लॅट खरेदी केला होता. आता या फ्लॅटची किंमत 90 टक्क्यांनी वाढली आहे. अक्षयने 34.50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरून फ्लॅट खरेदी केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने दुसरा फ्लॅट 1.35 कोटींना विकला आहे. ज्याचा कार्पेट एरिया फक्त 252 चौरस फूट आहे. अक्षयने हा फ्लॅट 2017 साली 67.90 लाखला खरेदी केला होता.

अक्षय कुमारने विकलेल्या प्रॉपर्टीचे लोकेशन काय?

मुंबई- बोरीवली

अक्षय कुमारने किती प्रॉपर्टी विकल्या?

दोन लग्जरी अपार्टमेंट्स

अक्षय कुमारला किती नफा झाला?

९०% पेक्षा जास्त नफा

अक्षय कुमारने दोन अपार्टमेंट्स कितीला विकले?

7.10 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जिल्हा परिषदेच्या ११८१ महिलांनी घेतला 'लाडकी'चा लाभ; आता कारवाई होणार; सरकारचे काढले आदेश

Shocking: शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत केली 'गंदी बात', शरीरसंबंधासाठी जबरदस्ती; विचारला अंडरवेअरचा रंग

Jio Recharge Plan: Jio युजर्सना धक्का! कंपनीने बंद केला 'हा' स्वस्त प्लॅन, लगेच जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोकणात भाजपची मोर्चेबांधणी

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

SCROLL FOR NEXT