akshay kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: अक्षय कुमार झाला मालामाल; अभिनेत्याने दुसऱ्यांदा विकले आलिशान अपार्टमेंट, ८४% झाला प्रॉफिट

Akshay Kumar: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने पुन्हा एकदा त्याचे एक अपार्टमेंट चढ्या भावाने विकले आहे. त्याने मुंबईतील आलिशान घरांपैकी एक असलेले कोट्यवधींचे अपार्टमेंट विकले आहे.

Shruti Vilas Kadam

Akshay Kumar: सिनेसृष्टीतील कलाकार हे हुशार गुंतवणूकदार देखील आहेत त्यांना माहित असते की त्यांना कोणत्या गोष्टीचा भविष्यत फायदा होणार आहे. अलिकडेच अक्षय कुमारनेही स्वतःचा फायदा पहिला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याने एक घर विकले आणि तेही मोठ्या नफ्यात. आता पुन्हा एकदा त्याने त्याचे आणखी एक घर विकले आहे.

अक्षय कुमारने मुंबईत असलेले एक घर मोठ्या किमतीत विकले आहे त्याची रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बोरिवली पूर्वेतील ओबेरॉय स्काय सिटी बिल्डिंगमध्ये त्याचे अपार्टमेंट आहे.

अक्षय कुमारला ८४ टक्के नफा झाला

आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांमधून स्क्वेअर यार्ड्सना मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने नोव्हेंबर २०१७ मध्ये ओबेरॉय स्काय सिटीमध्ये २.३७ कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले होते, जे त्याने ४.३५ कोटी रुपयांना विकले आहे. यानुसार, अक्षयला अपार्टमेंट विकून ८४% नफा झाला आहे.

अक्षयने आणखी एक फ्लॅट विकला होता

त्याच इमारतीत अक्षय कुमारचे आणखी एक अपार्टमेंट होते, जे त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ४.२५ कोटी रुपयांना विकले. ते विकून अक्षयला सुमारे ७८ टक्के नफा झाला. २०१७ मध्ये त्याने हे घर सुमारे २.३८ कोटी रुपयांना खरेदी केले. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १,०७३ चौरस फूट होता आणि त्यात दोन कार पार्किंग स्पेस देखील होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT