Akshay Kumar saam tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Haiwaan Release Date : अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या 'हैवान' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा प्रियदर्शन दिग्दर्शित ॲक्शन-थ्रिलर-ड्रामा आहे.

Shreya Maskar

'हैवान' चित्रपटाची रिलीज डेट समोर

अक्षय कुमार आणि सैफ अली खानचा फर्स्ट लुक पोस्टर आउट

'हैवान' प्रियदर्शन दिग्दर्शित ॲक्शन-थ्रिलर-ड्रामा आहे.

बहुप्रतीक्षित चित्रपट 'हैवान' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर आणि सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे स्टार अक्षय कुमार आणि सैफ अली खान एकत्र झळकणार आहेत. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर ड्रामा आहे. 'हैवान' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे.

'हैवान'चे नवीन पोस्टर्स

'हैवान' चित्रपटातील अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात अक्षय कुमार काळ्या रंगाच्या पोशाखात, एखाद्या दरोडेखोराप्रमाणे दिसत आहे. जो दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने डोक्यावर काळी 'बिनी' (टोपी) घातली आहे; विशेष म्हणजे, या टोपीमुळे त्याचे डोळे झाकलेले दिसत आहेत.

दुसऱ्या पोस्टरमध्ये सैफ अली खान अत्यंत आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजात समोर पाहताना दिसत आहे. आणखी एक पोस्टरमध्ये अक्षय कुमारचे पात्र लाल रंगाच्या छटेत (थीममध्ये) दिसत आहे, तर सैफ अली खानचे पात्र पिवळ्या रंगाच्या छटेत दिसत आहे.

'हैवान'ची रिलीज डेट काय?

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा थ्रिलर ड्रामा ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'हैवान'मध्ये अक्षय कुमार, सैफ अली खानसोबतच बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर हे कलाकार देखील झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT