Ram Setu Poster Twitter/ @Ramesh Bala
मनोरंजन बातम्या

Ram Setu: अक्षयचा बहुप्रतिक्षित 'रामसेतू' लवकरच येणार; सिनेमा हिट करण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'राम सेतू'चा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला असून पोस्टरमध्ये अक्षय कुमार, सत्यदेव, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'राम सेतू'चा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील इतरही कलाकार दिसत आहेत. (Bollywood) त्यामुळे चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा अधिकच रंगली आहे. या पोस्टरमध्ये मुख्य आकर्षण आहे, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा. (Bollywood Actor) (Bollywood Actress)

पोस्टरमध्ये प्रत्येकजण काहीतरी नवीन गोष्टीचा शोध घेताना दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा च्या चेहेऱ्यावर कोणते भाव बदलले आहेत ? कोणत्या गोष्टीने अवाक झाले आहेत? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 25 ऑक्टोबर 2022 पासून सिनेमागृहात राम सेतू चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटिया, विक्रम मल्होत्रा ​​यांनी केले आहे.

राम सेतू चित्रपटाचा नवा ट्रेलर मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. याआधी अक्षय रक्षाबंधन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत इतर चार अभिनेत्रींच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित होता.

अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात. मात्र, त्याचे शेवटचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्यामुळे अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट राम सेतूतील अनेक गोष्टींवर आधारित आहे. अक्षय कुमारने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

SCROLL FOR NEXT