Akshay kumar ram setu movie saam tv
मनोरंजन बातम्या

अक्षय कुमारचा 'राम सेतू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ; प्रदर्शनाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

अक्षय कुमारच्या राम सेतू सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. अक्षयचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली असते. याआधी अक्षयने 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात मूख्य भूमिका साकारली होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर (box office) या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला नाही, असं असतानाही अक्षय मात्र नव नव्या भूमिकेत त्याच्या चाहत्यांच मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच सक्रिय राहतो. आताही अक्षयने एका धार्मिक कथेवर आधारित 'राम सेतू' सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, अक्षयचा हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार ? कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार ? यासाठी वाचा ही सविस्तर बातमी.

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा (Ram Setu) 'राम सेतू'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबात निर्मात्यांनी दिलेली माहिती अशी की, हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न करता चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) यांच्याही भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधणाऱ्या आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. अक्षयने या सिनेमात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. दरम्यान, हा सिनेमा यंदा २४ ऑक्टोबरला दिवाळीला प्रदर्शित केला जाणार आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्शने या सिनेमाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. आदर्शने त्याच्या सोशल मीडीयावर म्हटलंय की,'राम सेतू' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार नसून तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा या वर्षी दिवाळीला २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे, असं विक्रम मल्होत्रानं स्पष्ट केलं आहे. अक्षय कुमारचे 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले. त्यानंतर राम सेतू या सिनेमाबाबात सिनेवर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं होतं.

त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी विक्रम यांनी अखेर सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित न करता सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा पहिल्यांदाचअक्षय कुमारसोबत पडद्यावर झळकणार आहे. अक्षयसोबत काम करण्याचा तिचा अनुभव तिने यावेळी शेअर केला आहे. अक्षय कुमार सरांसोबतचा मी पहिल्यांदाच काम केलं आहे. त्यामुळे 'राम सेतू' सिनेमा माझ्यासाठी खास असणार आहे. आजही मला अक्षय कुमार यांच्यासोबत शूट केलेला पहिला दिवस आठवतो.

त्यावेळचा पहिला शूटचीही मला आवर्जून आठवण होते. त्यावेळचा अनुभव मला खूप साऱ्या गोष्टी शिकवणारा होता. त्यावेळी मला विचार पडला की, मी माझे डायलॉग्स कसे बोलणार ? मी कुठे पाहू ? पण नेहमी एका गोष्टीचा आत्मविश्वास होता, की मला कसली भीती वाटत नाही. पण अक्षय कुमार यांना समोर पाहिल्यावर मला जरासं घाबरल्यासारखं वाटायचं, पण या सर्व गोष्टींचा मी विचार केला नाही कारण मला या सिनेमात अप्रतिम काम करायचं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT