दिनेश-आवेशची कमाल, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा, भारताचा दणदणीत विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज राजकोटमध्ये चौथा टी-२० सामना खेळवला जात आहे.
India- south Africa T-20 series
India- south Africa T-20 seriessaam tv
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून आज राजकोटमध्ये चौथा सामना खेळवला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध असलेली टी-२० सीरिज जिंकण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं अनिवार्य आहे. दरम्यान, राजकोटच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फंलदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १६९ धावा करत आफ्रिकेपुढं १७० धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर १७० धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेच्या फलंदाजांचा भारताच्या गोलंदाजांनी धुव्वा उडवला. अवघ्या ८७ धावांवर आफ्रिकेचा संघ गारद झाला. १६. ५ षटकांत आफ्रिकेचा ८७ धावांवर ऑलआऊट झाल्याने भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.

India- south Africa T-20 series
दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाही, हताश होऊ नका, शिक्षणमंत्री म्हणाल्या...

भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने चमकदार कामगिरी करत चार विकेट्स घेतल्या. तसेच आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात हिरो ठरलेला चहलने पुन्हा एकदा कमाल केली आहे. युजवेंद्र चहलने २ विकेट्स घेत भारताची वाटचाल विजयाच्या दिशेनं नेली. तसेच हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हार्दीक पंड्या आणि दिनेश कार्तिकच्या चौफेर फटकेबाजीमुळं भारताला १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातील रंगतदार लढत पाहण्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे सलामीवीर इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड मैदानात उतरले होते. भारत-दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकडवाडने अर्धशतक ठोकले होते. परंतु, आजच्या सामन्यात गायकवाडला मागील सामन्याप्रमाणे धावांचा सुर गवसला नाही. आफ्रिकेचा गोलंदाज एन्गिडीने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का देत ऋतुराज गायकडवाडला ५ धावांवर बाद केले.

India- south Africa T-20 series
Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका कायम; अशी आहे आजची ताजी आकडेवारी

त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आलेला भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. आफ्रिकेच्या मार्को येनसेनने श्रेयसला चार धावांवर बाद केले. त्यानंतर एर्निच नॉर्त्जेने सलामीवीर फलंदाज इशान किशनला २७ धावांवर बाद करुन पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये भारताची धावसंख्या ४०-३ अशी कोसळली होती. भारताचा डाव सावरण्यासाठी आलेल्या पंतलाही मोठी धावसंख्या करता आली नाही. केशव महाराजने भारताचा कर्णधार ऋषभ पंतला 17 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. त्यामुळे हार्दिक आणि ऋषभची चौथ्या विकेटसाठी केलेली 41 धावांची भागीदारीला महाराजने खंड पाडला.

मात्र, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत असतानाच दिनेश कार्तिकनेही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. हार्दिकने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार ठोकून ४६ धावा कुटल्या. तर दिनेश कार्तिकने २ षटकार आणि ९ चौकारांची चौफेर फटकेबाजी करत २७ चेंडूत ५५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com