OMG 2 Movie Review : २०१२ साली झालेल्या 'ओ माय गॉड' चित्रपटामध्ये कृष्णाच्या अवतारात दिसला होता. ११ वर्षांनंतर 'ओ माय गॉड २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने शंकराची आहे. तर या पहिल्या भागात परेश रावल मुख्य भूमिलेल होते आता आता दुसऱ्या भागात पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम मुख्य भूमिका साकारणार आहेत.
चित्रपटाची कथा
भारतातील अनेक भागात आजही सेक्स एज्युकेशन म्हणजे टॅबू आहे असे मानले जाते. 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रे यांनी शालेय शिक्षणात सेक्स एज्युकेशनचा समावेश असावा की असू नये या वादग्रस्त विषयावर या चित्रपटामधून भाष्य केले आहे.
चित्रपटाची कथा विवेक (आरुष वर्मा) आणि त्याच्या कुटुंबावर आधारित आहे. विवेकला शाळेत मास्टरबेशन करताना पडकले जाते त्यामुळे त्याला नैराश्य येते आणि त्याच्या कुटुंबाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा बदलतो अशी चित्रपटाची कथा आहे.
जेव्हा या कुटुंबाच्या आशा आणि लढण्याची क्षमता जेव्हा संपते, तेव्हा भगवान शंकर त्यांच्या दूताला (अक्षय कुमार) कुटुंबाच्या कठीण काळात सहकार्य करण्यासाठी आणि कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी पाठवतो.
अक्षय कुमार (दूत) विवेकचे वडील कांती शरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) यांना शाळा आणि समाजातील अनेकांविरुद्ध चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगतो. त्यानंतर कांती शरण मुद्गल हा टॅबू तोडण्यात कसा यशस्वी होतो हे OMG 2 चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे.
OMG 2 मध्ये एक असा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ज्यावर बोलायल अनेकांना लाज वाटते. लैंगिक शिक्षण आणि मास्टरबेशन असे विषय चित्रपटाच्या टीमने खुप विचारपुर्वक हाताळले असून चित्रपटातून एक सामाजिक संदेश देखील दिला आहे. हे सगळं चित्रपटामध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. सेकंट हाल्फमध्ये कॉमेडी आणि ड्रामा भरपूर आहे. सुरुवातीची 20 मिनिटे कथेची मांडणी करण्यासाठी वापरली आहेत.
फस्ट हाल्फचा शेवट थोडा कंटाळवाना आहे, परंतु शेवटच्या 40 मिनिटांत कथा खिळवून ठेवते. हॉस्पिटलमधील प्री-क्लायमॅक्समधील एका सीन खुप भावलनिक आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू येतील.
काय वर्क नाही?
खटल्याच्या सुरुवातीच्या भागात कोर्टरूम सीक्वेन्स अपेक्षेप्रमाने प्रभावी ठरत नाहीत. कोर्टातील वादविवादात थोडा वेळ जातो. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.