OMG 2 Box Office Collection  Saam TV
मनोरंजन बातम्या

OMG 2 Box Office Collection: 'गदर 2'च्या गदारोळात 'OMG 2' मोठी झेप; चित्रपटाची १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

OMG 2 Crossed 100 Crore: 'OMG 2' ने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Pooja Dange

OMG 2 Enter 100 Crore Club:

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'OMG 2' ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक शिकवण देणाऱ्या या चित्रपटाने 'गदर 2'च्या गदारोळात देखील बॉक्स ऑफिसबार चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर पाय स्थिरावल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची चांगली सुरुवात झाली आहे.

'OMG 2' ला 27 कटनंतर सेन्सॉर बोर्डाने A प्रमाणपत्र देऊन चित्रपटाला संमती दिली. यामुळे १८ वर्षांखालील मुले चित्रपट पाहू शकत नाहीत. इतक्या निर्बंधानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला 'OMG 2' ने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री

पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 कोटी 26 लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी व्यवसायात 49 टक्के वाढ झाली. या चित्रपटाने 15 कोटी 3 लाखांचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी 17 कोटी 55 लाखांचा व्यवसाय केला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 85 कोटी 5 लाख होते.

दुसऱ्या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी चित्रपटाने 6 कोटी 3 लाखांची कमाई केली. आता शनिवारी या चित्रपटाने जवळपास 10 कोटींचा गल्ला जमावाला आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 101 कोटींवर पोहोचले आहे. (Movie)

हा चित्रपट सेक्स एज्युकेशनवर आधारित आहे

OMG 2 चित्रपटाची कथा सेक्स एज्युकेशनवर आधारित आहे. मुलांना सेक्स एज्युकेशनचे ज्ञान असणे किती महत्त्वाचे आहे हे या चित्रपटातून लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार शंकराच्या दूताची भूमिका साकारत आहे.

दुसरीकडे, पंकज त्रिपाठी, कांती शरण मुद्गल या एका दुकानदाराची भूमिका साकारत आहेत. कांती शरण यांच्या जीवनात अचानक वादळ येते, जेव्हा त्यांचा मुलगा विवेक (आरुष वर्मा) समाजाच्या दृष्टीने वाईट काम करताना पकडले जाते. त्याच्यावर इतका अत्याचार केला जातो की तो स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतो.

या घटनेने दुखावलेले कांती शरण मुदगल न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. कांती आपल्या मुलासाठी लढण्याबरोबरच सेक्स एज्युकेशनबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचा धडा देऊन केस जिंकतात. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT