Samrat Prithviraj Movie : Akshay Kumar Manushi Chillar perform Aarti on Ganga Ghat Instagram/ @manushi_chhillar Instagram/ @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Prithviraj: अक्षय कुमार, मानुषी छिल्लर गंगाघाटावर; चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना

Samrat Prithviraj Movie : सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट ३ जून ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (Dr. Chandraprakash Dwivedi) दिग्दर्शित पीरियड ड्रामा या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. (Bollywood Upcoming movies 2022) काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अक्षय आणि मानुषी त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान अक्षय आणि मानुषी या दोघांनीही वाराणसीला (Varanasi) जाऊन पवित्र नगरीत संध्याकाळची आरती केली. या दोघांनी सोशल मीडियावर वाराणसीतील फोटोज शेयर करत त्यांना हर हर महादेव असं कॅप्शन दिलं आहे. (Akshay kumar And ManushI Chhillar Upcoming Movie)

हे देखील पाहा -

वाराणसीमध्ये गंगा घाटावर आरती

काही क्षणांपूर्वी, अक्षय आणि मानुषी यांनी आपापल्या इंस्टाग्रामवर वाराणसी या पवित्र शहरात त्यांचे काही फोटोज् शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, दोघेही भारतीय पारंपारिक पद्धातीचा पोशाख परिधान केलेले दिसतात. खिलाडी कुमारने पीच रंगाचा कुर्ता घातला होता, तर मानुषीही त्याच्यासोबत सारख्याच रंगाच्या सलवार सूटमध्ये सुंदर दिसत होती. यावेळी ते त्यांच्या दिग्दर्शकासह गंगा घाटावर संध्याकाळची आरती करताना दिसले. (Samrat Prithviraj Movie News)

सम्राट पृथ्वीराज ३ जूनला होणार रिलीज

सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट ३ जून ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट चौहान घराण्यातील राजपूत योद्धा राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित आहे, अक्षयने सांगितलं की, संयोगिताची भूमिका साकारणारी मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर हिचे बॉलीवूडमध्ये पदार्पण देखील होणार आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. खिलाडी कुमार आणि मानुषी व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, आशुतोष राणा, सोनू सूद, साक्षी तन्वर, मानव विज आणि ललित तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT