Jolly LLB 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 Controversy: अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलर अन् गाण्यावर बंदी घालण्याची हाय कोर्टात मागणी

Jolly LLB 3 Movie Controversy : 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Jolly LLB 3 Movie Controversy : बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. न्यायालयीन कथेवर आधारित या चित्रपटाला काही वकिलांनी विरोध दर्शवला आहे. आता पाटणा उच्च न्यायालयात या चित्रपटाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की 'जॉली एलएलबी ३' मध्ये न्यायव्यवस्था आणि कायदेशीर व्यवसायाचे अपमानजनक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. यामुळे वकिलांची आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे.

'जॉली एलएलबी ३' चित्रपटाविरुद्ध वकील नीरज कुमार यांनी पाटणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने न्यायालयाला या चित्रपटावर, त्यातील गाण्यांवर आणि प्रमोशनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले 'मेरा भाई वकील' हे गाणे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा या प्रकरणात उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाच्या गाण्यावर आणि प्रमोशनल मटेरियलमध्ये कायदेशीर व्यवसाय हास्यास्पदरीत्या दाखवण्यात आला आहे. यामुळे केवळ वकिलांची प्रतिष्ठाच खराब होत नाही तर जनतेमध्ये न्यायव्यवस्थेची प्रतिमाही डागाळली जाते.

याचिकेत, हायकोर्टाला जॉली एलएलबी ३ चे वादग्रस्त गाणे आणि ट्रेलरवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, चित्रपट निर्मात्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बिहार स्टेट बार कौन्सिलची परवानगी घेऊन चित्रपटात आवश्यक बदल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

जॉली एलएलबी ३ या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यासह सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, नंदिनी कपूर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT