अक्षय कुमार जगप्रसिद्ध रिॲलिटी शोचे होस्टिंग करणार आहे.
बॉलिवूडच्या खिलाडीला टिव्हीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
रिॲलिटी शोचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे.
बॉलिवूडचा खिलाडी टीव्हीवर येत आहे. त्याच्या नवीन शोची नुकतीच घोषणा झाली आहे. अक्षय कुमारला आता रोज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश आहे. अलिकडेच अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर तो अनेक शोमध्ये दिसला. मात्र आता अक्षय कुमार (Akshay Kumar) एक नवीन शो घेऊन येत आहे. या धमाकेदार शो चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अक्षय कुमारच्या नवीन शोचे नाव 'व्हील ऑफ फॉर्च्युन' (Wheel Of Fortune) असे आहे. या शोचे होस्टिंग अक्षय कुमार करणार आहे. त्यामुळे शोची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या शोमधून सर्वसामान्यांना आपले नशीब पालटण्याची संधी मिळणार आहे. हा टीव्ही शो तब्बल 40 देशांमध्ये प्रसिद्ध आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर पाहायला मिळणार आहे.
'व्हील ऑफ फॉर्च्युन' च्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बंगल्यातला नोकर कसा मालक बनतो आणि मालक नोकर हे प्रोमोत पाहायला मिळते. व्हिडीओत दिसते की, अक्षय कुमार एका मोठ्या घरात नोकर असतो. ज्याचे नाव रामू असते. त्या घरातील मालकाचा मृत्यू होतो. तेव्हा वकील मृत्यूपत्राचे वाचन करतात. तेव्हा वडील आपली कोट्यवधींची संपत्ती मुलगा रामच्या नावावर न करता नोकर रामूच्या नावावर केल्याचं दिसते. हे पाहून सर्वांना धक्का बसतो. खरंतर मृत्यूपत्रात 'राम' नाव लिहिलेले असते मात्र अक्षय कुमार खूप हुशाहीने रामाचे 'रामू' करतो आणि नोकरचा मालक बनतो.
'व्हील ऑफ फॉर्च्युन' हा अमेरिकेतील हा सगळ्यात प्रसिद्ध टीव्ही शो आहे. या शोला 8 एमी अवॉर्ड्स मिळाले आहेत. प्रोमोच्या शेवटी अक्षय कुमार 'तीस मार खान'च्या लूकमध्ये दिसतो आणि म्हणतो की, "एका ऊकारामुळे सगळं बदललं. शब्दांची जादू आहे, त्यामुळे जादूचे चक्र फिरल्यावर एक एक अक्षर महत्त्वाचे आहे. " शोची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.