Shruti Vilas Kadam
लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये अग्रस्थानी आहेत आणि त्याची लोकप्रियता व ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे.
एफसी बार्सिलोना, पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि सध्या इंटर मियामी यांसारख्या क्लब्ससोबतच्या करारांमधून मेस्सीने प्रचंड कमाई केली आहे. इंटर मियामीसोबतचा करारही अत्यंत फायदेशीर मानला जातो.
मेस्सी Adidas, Pepsi, Apple, Gatorade यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा चेहरा आहे. जाहिराती आणि ब्रँड करारातून त्यांना दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची कमाई होते.
मेस्सीने हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट आणि विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावाने चालणारी MiM Hotels ही साखळी प्रसिद्ध आहे.
बॅलन डी’ऑर, FIFA पुरस्कार, स्पर्धा विजेतेपदांचे बोनस यामधूनही मेस्सीला मोठी आर्थिक कमाई झाली आहे.
मेस्सीकडे आलिशान घरे, महागड्या कार्स, खासगी जेट आणि लक्झरी लाइफस्टाईल आहे. तरीही ते तुलनेने साधी जीवनशैली जगतात असे मानले जाते.
फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी यांची एकूण संपत्ती अंदाजे 650 ते 700 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी मानली जाते. ही रक्कम त्यांच्या खेळातील कमाई, जाहिराती आणि गुंतवणुकीतून तयार झाली आहे.