Raveena Tandon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raveena Tandon: रविना टंडन- अक्षय कुमारचा गुपचूप झाला होता साखरपुडा, मात्र लग्न होण्याआधीच सपलं नातं

Raveena Tandon- Akshay Kumar Lovestory: ९० च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही जोडी चांगलीच चर्चेत होती. यांच्या पडद्यावरील केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Manasvi Choudhary

इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रविनाचा आज वाढदिवस आहे. चित्रपटातील तिच्या अदा आणि मनमोहक सौंदर्याने सर्वांनाच मोहिनी घातली. प्रोफेशनल लाईफसह रविनाच्या पर्सनल लाईफची देखील तुफान चर्चा रंगली.

९० च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही जोडी चांगलीच चर्चेत होती. यांच्या पडद्यावरील केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. हे ऑनस्क्रीन जोडपे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमाड पडले होते. एवढंच नाही तर या दोघांचं लग्न देखील होणार होतं मात्र काही कारणामुळे या दोघांचा साखरपुडा मोडला नेमकं काय होतं कारण जाणून घेऊया.

रवीनाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या 'पत्थर के फूल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत होता. रविनाचा पहिला सुपरहिट ठरला. त्यानंतर १९९४ साली तिचा 'मोहरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत दिसली होती. याच चित्रपटाच्यावेळी अक्षय आणि रवीनामध्ये जवळीक निर्माण झाली. चित्रपटादरम्यानच अक्षय- रवीनाचे प्रेम फुलले. अनेकदा हे दोघे एकत्र दिसले.

अक्षय आणि रवीना पंजाबी कुटुंबातून होते. त्यामुळे हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. तसेच त्यांचा साखरपुडा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मोहरा चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते दोघे साखरपुडा करणार होते. रविनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की दोघांनी मंदिरात गुपचूपपणे साखपुडाही केला होता.

मात्र काही दिवसांनातर अक्षयच्या एका कृत्याने हे जोडपे वेगळे झाले ते कायमचे वेगळे झाले. अक्षयचे वागणं रविनाला खटकत होतं. प्रत्येक चित्रपटाच्या वेळी त्याची अभिनेत्रीसोबतची जवळीक रवीनाला आवडत नव्हती. रवीना कधीही उघडपणे यावर बोलली नाही. पण अक्षय आणि तिच्यामध्ये यामुळेच दुरावा निर्माण झाला. रविनाने अनेकदा तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे प्रेमात विश्वासच सगळं काही असतो आणि अक्षयने तिचा विश्वासघात केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई एअरपोर्टपर्यंतचा प्रवास होणार सुसाट, ४ पदरी पूल बांधणार; कसा असणार प्लान?

Shocking: 'त्या दाढीवाल्या आजोबानं माझ्या...'. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शेजारी राहणाऱ्याचं भयंकर कृत्य

Maharashtra Live News Update: गावठी पिस्तुल,काडतूस,हत्यारे बाळागणारा मनमाड पोलिसांच्या ताब्यात

Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Famous Artist Death: थराररक! 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रसिद्ध आर्टिस्टचा २९ व्या वर्षी मृत्यू; सिंहाने जबडा खाल्ला

SCROLL FOR NEXT