Akshay Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: बॉलिवूडचा खिलाडी करणार दाक्षिणात्य चित्रपटात धमाका, कोणत्या भूमिकेत दिसणार?

Akshay Kumar Telugu Movie : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच तेलगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात खिलाडी कोणती भूमिका साकारणार जाणून घ्या.

Shreya Maskar

बॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. तो प्रेक्षकांसाठी त्याचे अनेक चित्रपट घेवून येत असतो. त्याच्या अभिनयाने त्यांने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहत्यानां नेहमीच या बॅलिवूड सुपरस्टारच चित्रपट पाहण्याचं वेड आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमुळे त्याने चाहत्याच्यां मनात आपले मानाचे स्थान ही मिळवले आहे. या चित्रपटामुळे अभिनेता तेलगुमध्ये पदार्पण करुन एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पण सध्या अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त दोन चित्रपटांबद्दल सांगितले आहे. ९सप्टेंबर रोजी विष्णू मंच यांनी अक्षयचा 'कन्नपा'मधील फस्ट लूक पोस्टरद्वारे शेअर केला होता. सध्या अक्षय प्रेक्षकांसाठी दोन नवीन चित्रपट (Movie) घेवून येत आहे. एक म्हणचे 'भूत बंगला'आणि दुसरा म्हणजे 'कन्नपा' होय. त्या पोस्टरवर तेलगू अभिनेता विष्णू मंच यांनी ही अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनत्याने प्रेक्षकांसाठी 'कन्नपा' चित्रपटातला त्याचा पहिला लुक शेअर केला आहे.

अक्षयची 'कन्नपा'मधील पोस्टरची पहिली झलक

अभिनेत्याची कन्नपामधील पहिली झलक चाहत्यांना फार आवडलेली आहे. त्या पोस्टरमध्ये अभिनेत्याने भगवान शंकराचा लूक केला आहे. त्याने आपल्या हातावर भगवान शंकराची रुद्राक्ष माळ बांधलेली आहे. अक्षयच्या पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये असं लिहिलय की , भगवान शंकर (Shankar) जेव्हा सर्व क्षेत्रांवर आपले राज्य करत असतात, तेव्हा भक्तांच्या भक्तीची श्रद्धा अपार असते तेव्हा ते भक्तांच्या श्रध्देचे अनुसरण करतात.

अक्षयचा हा 'कन्नपा' चित्रपट सुपरहिट ठरणार आहे असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. अभिनेत्याच्या पोस्टरमधील लूकला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अक्षय कुमारसह (akshay kumar) या चित्रपटात विष्णू मंचू ,प्रभास, मोहनलाल, प्रभुदेवा आणि शरतकुमार यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सर्वांना आवडलेले असून त्याचा टीझर जूनमध्ये प्रदर्शित (displayed) झाला होता. निर्मात्यांनी कन्नपा या चित्रपटाचा फस्ट लूक मार्च २०२४ वर्षी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी शेअर केला होता. अक्षयचा 'कन्नपा' हा चित्रपट तेलगु, तमिळ, आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्षित होणार आहे.

अलीकडे अक्षय कुमारचे खूप चित्रपट (movie) फ्लॅाप होत आहेत. चाहत्यांनी त्याच्या अनेक चित्रपटांना नापसंत केले आहे. म्हणून अभिनेता अक्षय कुमारला आणखी एका हिट चित्रपटाची गरज आहे. अक्षयचे आताच्या काळी येणारे चित्रपट हिट ठरणार की नाही, याचे लक्ष चाहत्यांकडे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT