मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Movie: देशाच्या पहिल्या हवाई हल्ल्याचा थरार रूपेरी पडद्यावर: अक्षय कुमारच्या 'Sky Force'ची रिलीज डेट जाहीर

'Sky Force' teaser released: अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे.

Pooja Dange

Akshay Kumar Movie Sky Force Release Date:

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे. अक्षय कुमारने 'स्काय फोर्स' चित्रपटाची घोषणा केली आहे.

अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'मिशन रानीगंज' चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. तर आता अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट ही घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, 'आज गांधी-शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश म्हणत आहे, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. 'स्काय फोर्स' भारताच्या पहिल्या आणि प्राणघातक एअर स्ट्राईकची न ऐकलेली कथा.

या चित्रपटाला खूप प्रेम द्या. जय हिंद, जय भारत. 'स्काय फोर्स' २ ऑक्टोबर २०२४ ला चित्रपटगृहात उड्डाण घेणार आहे.' या मेसेजसह अक्षय कुमारने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लाल बहादुर शास्त्री भारताच्या एअर स्ट्राईकविषयी बोलत आहेत.

पहिल्या दिवशी चित्रपटाने १.३० कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी २.२० कोटींची कमाई केली आहे. 'बाय वन गेट वन' ऑफरचा काल या चित्रपटाला फायदा झाला असे दिसत आहे.

अक्षय कुमारचे फॅन्स त्याच्या 'मिशन रानीगंज' चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच अक्षय कुमार 'हेरा फेरी ३' आणि 'वेलकम टू द जंगल'मध्ये देखील दिसणार आहे. यासह दाक्षिणात्य चित्रपट 'सोरारई पोट्रू'च्या हिंदी रिमेकमध्ये देखील अक्षय कुमार काम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT