Akshay Kumar and Samantha Ruth Prabhu will come together in the third episode of Karan Johars talk show Koffee With Karan 7 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan : सामंथाला उचलून घेत 'खिलाडी' अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडिओ

करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण ७'च्या तिसऱ्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि 'ऊ अंटावा गर्ल' सामंथा रुथ प्रभू ही अनोखी जोडी एकत्र दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण ७'(Koffee With Karan)च्या तिसऱ्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि 'ऊ अंटावा गर्ल' सामंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) ही अनोखी जोडी एकत्र दिसणार आहे. अक्षय यापूर्वी अनेकदा या शोमध्ये आला होता, तर सामंथा पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. सामंथा करण जोहरसोबत या भागात मौजमस्ती करताना दिसली. इतकंच नाही तर सामंथाने मोडलेल्या लग्नासाठी करणला जबाबदार धरलं आहे. करण जोहरविरुद्ध सामंथाच्या या आरोपावर अक्षयही तिला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहे.

शोच्या तिसर्‍या भागात, अक्षय कुमार त्याच्या खऱ्या खिलाडी अवतारात सामंथा रुथ प्रभूला उचलून शोमध्ये घेऊन येताना दिसत आहे. त्याचवेळी, या शोमध्ये करण जोहर अक्षय कुमारला ऑस्करच्या वादग्रस्त कथेला जोडून एक प्रश्न विचारणार आहे, ज्याला अक्षयही कठोरपणे उत्तर देताना दिसत आहे. क्रिस रॉक-विल स्मिथच्या ऑस्करमधील प्रकरणाला जोडून करण जोहरने अक्षय कुमारला विचारले, "जर क्रिस रॉकने टीना (ट्विंकल खन्ना) बद्दल विनोद केला तर तू काय करशील?" , 'त्याच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च मी उचलेन', असे अक्षय कुमारने करण जोहरला उत्तर दिले.

त्यानंतर सामंथा रुथ प्रभूला करण जोहर विचारतो की, 'जर तूला तुझ्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी होस्ट करायची असेल, तर तू कोणत्या दोन बॉलिवूड कलाकारांना डान्स करायला घ्याल? यावर सामंथा म्हणाली, "रणवीर सिंग आणि फक्त रणवीर सिंग."

कॉफी विथ करणच्या या नव्या भागात खूप धमाल येणार आहे. त्याचसोबत या भागात प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार आहे, हे या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. शोचा नवीन भाग डिस्ने प्लस हॉट स्टारवर दर गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

Shocking Crime: बड्या व्यापाऱ्याला घेरलं अन् १०-१२ गोळ्या झाडल्या; लॉरेन्स गँगनं घेतली हत्येची जबाबदारी

Dry Clothes Without Sun : उन्हाशिवाय कपडे कसे वाळवायचे?

SCROLL FOR NEXT