Sidnaaz ला २ वर्षे पूर्ण, फॅन्स म्हणाले, सिडनाजची अशी लव्हस्टोरी...

बिग बॉस फेम शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे चाहते 'सिडनाज'ला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. चाहते त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
Big Boss fame Shehnaaz Gill and Siddharth Shukla fans are celebrating two years of Sidnaaz
Big Boss fame Shehnaaz Gill and Siddharth Shukla fans are celebrating two years of Sidnaaz Saam Tv
Published On

मुंबई : बिग बॉस फेम शहनाज गिल(Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे चाहते 'सिडनाज'ला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. चाहते त्यांचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'बिग बॉस १३'(Big Boss) मध्ये एकमेकांना भेटलेल्या शहनाज आणि सिद्धार्थने त्यांच्या क्यूट जोक्स आणि प्रेमाने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. सिद्धार्थच्या आकस्मिक निधनानंतर सिद्धार्थचे चाहते त्याचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्या दोघांच्या प्रेमाची आठवण काढत आहेत.

Big Boss fame Shehnaaz Gill and Siddharth Shukla fans are celebrating two years of Sidnaaz
Case Toh Banta Hai Trailer Out : रितेश देशमुख सेलिब्रिटींवर करणार आरोप, पाहा 'केस तो बनता है'चा मजेदार ट्रेलर

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांना भेटून २ वर्षे पूर्ण झाली आहेत. चाहते या निमित्ताने आनंद साजरा करत आहेत. सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहत एका चाहत्याने ट्विट केले, 'दोन वर्षांपूर्वी...आजच्या दिवशी...अनेक आठवणी...आमच्या चॅम्पने आम्हाला #सिडनाजचे चाहते असं नाव दिलं'.

Big Boss fame Shehnaaz Gill and Siddharth Shukla fans are celebrating two years of Sidnaaz
Viral Photo : मालदीवच्या समुद्रात रोमान्स करताना दिसले विकी कौशल-कतरिना कैफ

चाहत्याने पुढे लिहिले की, "तेव्हापासून बरेच काही बदलले आहे, परंतु आमचे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यावरील प्रेम वाढतच राहील'. एका चाहत्याने ट्विट केले की, 'आम्ही भाग्यवान आहोत की, आम्ही अशी एक प्रेमकथा बघितली जी या जगातून कायमची निघून गेली'.

अलीकडेच एका चाहत्याने ट्विटरवर शहनाज गिलचा 'सिडनाज' म्हणून ऑटोग्राफ साइन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. युजर्रने लिहिले, 'ज्या प्रकारे तिने ऑटोग्राफ दिला. आधी सिड आणि नंतर नाज लिहिले. मला वाटले की सिद्धार्थ आता एखाद्या गार्डियन एंजेलसारखा तिच्यावर लक्ष ठेवून आहे'.

सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर शहनाजने 'बिग बॉस १५' च्या मंचावर त्याला श्रद्धांजली वाहिली. शहनाज लवकरच सलमान खानच्या आगामी 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ निगम देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com