Nayna And Adwait Haldi Ceremony Instagram
मनोरंजन बातम्या

Laxmichya Paulanni Serial: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये नयना-अद्वैतची लगीनघाई, लवकरच लागणार हळद

Laxmichya Paulanni Serial Latest Update: 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेला अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये, नयना-अद्वैतच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Nayna And Adwait Haldi Ceremony News

स्टार प्रवाहावरील ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका कायमच टीआरपी चार्टमध्ये टॉप ५ मध्ये पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेला अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये, नयना-अद्वैतच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. (Tv Serial)

नुकताच निर्मात्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नयना-अद्वैतच्या हळदीची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये अद्वैत म्हणजेच अक्षर कोठारीच्या तोंडाला आणि हाता- पायाला हळद लावलेली पाहायला मिळत आहे. यांच्या हळदी सोहळ्याला स्टार प्रवाहातील अनेक सेलिब्रिटीही दिसणार आहेत. यांच्या विवाह सोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. (Star Pravah)

यांच्या लग्नसोहळ्याला नयना आणि अद्वैतच्या घरातील मंडळी काय धमाल मस्ती करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेला अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

नयना-अद्वैतची लव्हस्टोरी, खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक आणि तगडी स्टारकास्ट आपल्याला मालिकेमध्ये आणखी नवनवीन काय ट्वीस्ट मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नयना-अद्वैतच्याही लग्नामध्ये त्यांच्या घरातील मंडळी किती धमाल- मस्ती करणार ?, हळदीमध्ये स्पेशल आऊटफिट काय असणार ? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांना उपस्थित झाले आहे. (Social Media)

मालिकेविषयी सांगायचे तर, अक्षर कोठारी आणि ईशा केसकरची ही 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिका स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होत आहे. नोव्हेंबर २०२३ पासून ही मालिका टेलिकास्ट होत आहे. या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही मालिका कायमच टीआरपी चार्टमध्ये टॉप ५ मध्ये पाहायला मिळते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT