मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भडवली या छोट्याशा गावातील वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील तबलावादक (Tabla Player) अजित लोहर (Ajit Lohar) यांनी सलग तीन तास चौदा सेकंद तबला वादन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of Record) नोंद झाली आहे. लोहार यांना या रेकॉर्डबद्दल सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. भडवली व धामणे -परंदवडी ग्रामस्थांसह वारकरी संप्रयदायाच्या वतीने तबला वादनात रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
हे देखील पाहा -
अजित लोहार हे मावळ तालुक्यातील तबलावादक असून पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर व सुभाष देशमुख यांचे शिष्य आहेत. पावन मावळ दिंडी समाजाचे हभप रघुनाथ महाराज लोहार यांच्या मार्गदर्शनाने वयाच्या आठव्या वर्षांपासून ते तबला वादनाचे धडे गिरवत आहेत. लोहर यांना यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर तबला वादनात सुवर्णपदक मिळालेले आहे. राज्यातील प्रख्यात कीर्तनकार हभप बाबामहाराज सातारकर, भागवत कथाकार हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर, रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्यासह अनेक प्रख्यात गायकांना तबल्याची साथसंगत केली आहे.
लोहर यांनी सर्वात जास्त वेळ म्हणजेच सलग तीन तास १४ सेकंद तबला वादन केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नोंद झाली आहे. यासाठी त्यांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. असा रेकॉर्ड करणारे अजित लोहार हे राज्यातील पहिले युवा कलाकार असून लोहर यांनी रेकॉर्डबाबत भावना व्यक्त करताना सर्व श्रेय आई-वडील यांना दिले आहे. लोहर यांना यापूर्वी मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी आणि दिल्ली येथील भारत सरकार मान्यताप्राप्त मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याद्वारे बेस्ट तबला आर्टिस्ट पुरस्कार मिळालेला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.