PM नरेंद्र मोदींवर केलेली टीका दिपाली सय्यद यांना भोवणार

सय्यद यांनी मोदींवर केलेली टीका त्यांना महागात पडली आहे. त्यामुळं अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
narendra modi and deepali sayed
narendra modi and deepali sayed Saam Tv

मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद (Deepali Sayed) सध्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय झाल्या आहे. दिपाली सय्यद या भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अनेक मुद्यांवरून चौफेर फटकेबाजी करताना दिसतात. कालच दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्यावर टीका केली होती. सय्यद यांनी मोदींवर केलेली टीका त्यांना महागात पडली आहे. त्यामुळं अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Deepali sayed Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. सय्यद म्हणाल्या होत्या, ' किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा *@#*%@% (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल" अशी खोचक टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र, हीच टीका शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना भोवण्याची शक्यता आहे. सय्यद यांच्या टीकेनंतर त्यांच्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिपण्णी केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

narendra modi and deepali sayed
...तर हाच शनी भारी पडेल; उद्धव ठाकरेंवरील नवनीत राणांच्या टीकेनंतर दीपाली सय्यद कडाडल्या

दरम्यान,तसेच त्या काही दिवसांपूर्वी मनसेवरही चांगल्याच बरसल्या होत्या. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला म्हणून त्यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दिपाली सय्यद यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींसहित अमित शाह यांच्यावरही महागाईवरून जोरदार टीका केली होती. त्यावेळी दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या, 'मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा, वाढती महागाई, दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या' अशा शब्दात सैय्यद यांनी भाजप वरिष्ठ नेत्यांवर महागाईवरून टीका केली होती. त्यामुळं सय्यद यांची मोदींविरोधात केलेली टीका भोवणार असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com