गर्दी कसली? सेलिब्रिटी कोण? अजितदादांच्या एन्ट्रीला हिरो झाला साईड हिरो (पहा Video) SaamTV/@ganeshshelar
मनोरंजन बातम्या

गर्दी कसली? सेलिब्रिटी कोण? अजितदादांच्या एन्ट्रीला हिरो झाला साईड हिरो (पहा Video)

सोशल मिडीयावरती (Social Media) एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या Video मध्ये अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) लग्नासाठी जात असताना मुंबई विमानतळाच्या VIP गेट वरती उभा आहे आणि मागून अजित पवार येत आहेत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या सोशल मिडीयावरती (Social Media) एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या Video मध्ये अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) लग्नासाठी जात असताना मुंबई विमानतळाच्या VIP गेट वरती उभा होता. आणि त्याचे फोटो काढण्यासाठी आणि पाहण्यासाठीही काही लोकांना तिथे गर्दी केल्यांच दिसतं आहे. तसंच या सर्वांनासमोर विकी कौशलही कॅमेरा समोर हात हलवून पोज देताना दिसतं आहे. (Ajit Dada's entry and Vicky Kaushal's photoshoot)

पहा व्हिडीओ -

मात्र नेहमीच आपल्या वेगळ्या अदांजामुळे ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) मागून येताना दिसत आहेत, सुरक्षा रक्षकांनी विकी कौशलला बाजूला होण्यास सांगितलं मात्र अजित पवारांच देखील तिकडे लक्ष गेलं मात्र दादा कामाच्या धावपळीत थेट मोबाईवरती बोलत निघून गेल्याचं दिसतं आहे.

सेलिब्रिटी काय? गर्दी काय? -

सेलिब्रिटी म्हटलं की प्रत्येकाला त्यांच्याप्रती एक वेगळच आकर्षण असतं त्यांना बघण्यासाठी लोकांकडून नेहमी गर्दी केली जाते आणि अशीच गर्दी त्या दिवशी मुंबई विमानतळाच्या VIP गेटवरती देखील झाली होती. त्यामुळे साहजिकच जर अजित पवारांच्या जागी कोणी दुसरा व्यक्ती असता तर त्या सेलिब्रिटीला बघत कदाचित बोलत थांबला असता मात्र दादांच कसलं काय़; अजित पवार आपल्या कामात मोबाईल वर बोलता बोलता थेट बाहेर पडले, बाजूला कोण सेलिब्रिटी काय? गर्दी काय? आणि कसलं फोटो शूट कशाकडेही त्यांचं लक्ष गेले नाही.

ते आपल्या कामाच्या धावपळीत सरळ निघून गेले मोबाईलवरती बोलत त्यामुळे दादांचा अंदाजच वेगळा असं त्यांच्या समर्थकांकडून म्हणलं जात आहे. त्यामुळे दादांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (VIdeo Viral) होतं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT