Ajay Devgn Birthday saam tv
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Birthday : अभिनेता नाही तर 'हे' बनायचे होते बॉलिवूडच्या 'सिंघम'ला, एका चित्रपटाने नशीब पालटले

Ajay Devgn Unknown Facts : बॉलिवूडचा सिंघम म्हणून अजय देवगणला ओळखले जाते. वाढदिवसानिमित्त त्याच्या बद्दल काही Unknown Facts जाणून घेऊयात. बॉलिवूडच्या 'सिंघम'ला अभिनयाऐवजी एका दुसऱ्या क्षेत्रात काम करायचे होते.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या सिंघमचा वाढदिवस आहे.

अजय देवगणला अभिनयाऐवजी एका दुसऱ्या क्षेत्रात काम करायचे होते.

आता अजय देवगण हा बॉलिवूडच्या टॉप हिरोमध्ये येतो.

बॉलिवूडचा सिंघम (Ajay Devgn Birthday ) आता 57 वर्षांचा झाला आहे. अभिनेता अजय देवगणचा उद्या 2 एप्रिलला वाढदिवस आहे. तान्हाजी, दृश्यम, सिंघम, गोलमाल अगेन, रेड हे त्याचे गाजलेले चित्रपट आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. अजय देवगण हा बॉलिवूडचा सिंघम आहे. लाखो लोक त्याच्या दमदार अभिनयाचे दिवाने आहेत. त्याने केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर चित्रपटसृष्टीत एक मोलाचे स्थान निर्माण केले आहे. अजय देवगण हा बॉलिवूडच्या टॉप हिरोमध्ये येतो. मात्र अजय देवगणला अभिनयाऐवजी एका दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचे होते.

अजय देवगणने दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न घेऊन हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अजय देवगणचे खरे नाव विशाल वीरू देवगण असे आहे. वीरू देवगण हे चित्रपट दिग्दर्शक होते. तर त्याच्या आईने अनेक चित्रपटांची निर्माती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगण याने शिक्षण पूर्ण झाल्यावर दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्याची भेट कुक्कू कोहली यांच्याशी झाली, जे 'फूल और कांटे' या नवीन चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होते आणि रोमँटिक भूमिका तसेच ॲक्शन दृश्ये साकारू शकणाऱ्या अभिनेत्याच्या शोधात होते. तेव्हा त्यांनी अजय देवगणच्या ॲक्शन आणि नृत्यातील कौशल्याबद्दल ऐकले आणि त्याला मुख्य भूमिकेची ऑफर दिली. अजय देवगणला पहिल्याच चित्रपटातून खूप यश मिळाले त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

2003 मध्ये अजय देवगणचा 'द लीजेंड ऑफ भगत सिंह' चित्रपट रिलीज झाला. यातून त्याने भगत सिंग यांचे पात्र रुपेरी पडद्यावर जिवंत केले. त्यानंतर अजय देवगणने 'गंगाजल' , 'ओमकारा' हे चित्रपट रिलीज झाले. त्यानंतरच्या पुढच्या काळात अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपट केले. बॉलिवूडमधील यशानंतर अजय देवगणने आपले दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अजय देवगणने २००८ मध्ये 'यू मी और हम' या रोमँटिक-ड्रामा चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तो काजोलसोबत झळकला.

अजय देवगण दिग्दर्शित चित्रपट

Bholaa (2023)- 'भोला' एक अत्यंत तीव्र ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अजय देवगणने केले असून, यात त्याने एका कैद्याची भूमिका साकारली आहे.

Runway 34 (2022) - 'रनवे ३४' चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. यात अजय देवगणने एका वैमानिकाची भूमिका साकारली आहे.

Shivaay (2016): 'शिवाय' चित्रपट अजय देवगणने दिग्दर्शित केला. हा ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट आहे.

U Me Aur Hum (2008): 'यू मी और हम' चित्रपट अजय देवगणचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून तरुणाचा खून, चौघांना अटक

Paneer Phool Benefits For Diabetes: डायबिटिजच्या रूग्णांसाठी आयुर्वेदिक औषध 'पनीर फूल', फायदे? जाणून घ्या

IPL Points Table: आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर; पराभवानंतर राजस्थानला बसला मोठा फटका,अव्वलस्थानी असणाऱ्या पंजाबचं काय झालं?

Deep Neck Blouse Designs : अगदी साधी साडीसुद्धा दिसेल स्टायलिश, पाहा 'डीप नेक ब्लाउज'च्या ५ ट्रेंडी डिझाइन्स

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! ८व्या वेतन आयोगात ₹50,000 बेसिक सॅलरीची शक्यता, काय आहेत नेमक्या मागण्या?

SCROLL FOR NEXT