अजय देवगनचा 'भुज' होणार या तारखेला प्रदर्शित
अजय देवगनचा 'भुज' होणार या तारखेला प्रदर्शित Twitter/ @ajaydevgn
मनोरंजन बातम्या

अजय देवगनचा 'भुज' या तारखेला होणार प्रदर्शित

वृत्तसंस्था

अजय देवगनच्या (Ajay Devgan) 'भुज - द प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj: The Pride of India) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत असलेला अजय देवगनचा हा पहिला चित्रपट आहे, जो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रर्दशित होणार आहे. 'भुज - प्राइड ऑफ इंडिया' मध्ये संजय दत्त (Sanjay Dutt), सोनाक्षी सिन्हा, अ‍ॅमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मंगळवारी अजयने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले करुण रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी घडलेल्या एका खऱ्या आणि धाडसी घटनेवर हा चित्रपट आधीरित आहे.

अजय भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे. जो त्यावेळी भुज विमानतळाचा प्रभारी होता. युद्धाच्या वेळी शत्रूंनी हवाई तळ नष्ट केले. त्यानंतर विजयने जवळच्या माधापूर गावातल्या 300 महिलांसह भारतीय हवाई दलाची विमान उतरता यावी यासाठी हवाई तळ तयार केला होता. चित्रपटाचा ट्रेलर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी कोणती घ्यावी खबरदारी?

Online Fraud : पिझ्झा फ्रेंचायसी देण्याचे कारण सांगत साडेअकरा लाखांत फसवणूक

Today's Marathi News Live: बीडच्या नांदूरघाट येथील दगडफेक प्रकरणी 321 जणांवर गुन्हा दाखल

Benifits of Vegetables: फळं आणि भाज्या खाल्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या

Pankaj Jha Accused Actor Pankaj Tripathi : 'स्ट्रगलचा ढोल बडवणारे...', 'पंचायत'मधील आमदाराचा पंकज त्रिपाठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT