Aishwarya Rai Bachchans look out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ponniyin Selvan : ऐश्वर्या रायचा 'राणी नंदिनी'चा पहिला लूक बघाच, जणू अप्सराच

मणिरत्नमच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'मधील ऐश्वर्या राय बच्चनचा लूक समोर आला आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी ऐश्वर्याची ओळख करून दिली आहे. ऐश्वर्या राणी नंदिनीच्या भूमिकेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन'(Ponniyin Selvan) हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. बुधवारी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऐश्वर्या राय बच्चनचा(Aishwarya Rai Bachchan) राणी नंदिनीच्या भूमिकेतील पहिला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित केला. राणी नंदिनीच्या रुपात ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक समोर येताच सोशल मीडियावर तिचा लूक मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागला आहे. चाहते ऐश्वर्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.

'पोन्नियिन सेल्वन'च्या पोस्टरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन साडी लूकमध्ये आहे. तिने लक्ष वेधून घेणारे दागिने परिधान केले आहेत. तिचे लांबसडक मोकळे केस आहेत. ऐश्वर्याचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी तिची ओळखही एका खास पद्धतीने दिली आहे, जी लोकांना खूप आवडत आहे.

पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, 'सूडाचा चेहरा सुंदर आहे! पाझवूरची राणी भेटा नंदिनीला! #PS1 तामिळ, हिंदी, तेलुगू , मल्याळम आणि कन्नडमध्ये ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या पोस्टरने ऐश्वर्याच्या चाहत्यांना पूर्णपणे प्रभावित केले आहे.

या पोस्टरवरील ऐश्वर्याच्या सौंदर्यानं फॅन्सना जणू मोहिनीच घातली आहे. चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. "भारतीय सिनेमाची राणी परत आली आहे", असे एका चाहत्यानं म्हटलं आहे. "वाह! आम्ही याच सुंदरतेची वाट पाहत होतो" असे अन्य एका यूजरनं म्हटलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन तब्बल चार वर्षांनंतर 'पोन्नियिन सेल्वन'मधून मोठ्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्या खूप उत्सुक आहे.

मणिरत्नमने दिग्दर्शित केलेला 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट ज्येष्ठ लेखिका कल्की यांनी लिहिलेल्या पोन्नियिन सेल्वनया तमिळ कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत चियान विक्रम, तृषा, जयम रवि, जयराम, पार्थिबन, कार्थी, प्रभु आणि प्रकाश राज हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे २ भाग असून पहिला भाग ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये तामिळ, तेलुगू ,मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT