Aishwarya Narkar And Avinash Narkar Trolling
Aishwarya Narkar And Avinash Narkar Trolling Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar And Avinash Narkar Video: ‘म्हातारचाळे करायला लागलेले आजी आजोबा…’; म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिले खरमरीत उत्तर

Chetan Bodke

Aishwarya Narkar And Avinash Narkar Trolling

मराठी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये लोकप्रिय कपलमध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे कायमच चर्चेत असतात. नेहमीच रिल्समुळे चर्चेत राहणारं हे कपल यावेळी सुद्धा एका रिल्समुळे चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओवर जेव्हा युझरने ट्रोल केले, त्यावर अभिनेत्रीने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले.

मालिका आणि नाटकाच्या माध्यमातून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. ही जोडी नेहमीच स्वत:ला नव्या जमान्यासोबत अपडेट ठेवते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली होती. त्या व्हिडीओवरून त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. दरम्यान, त्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या नारकर यांनी थेट उत्तर दिले आहे.

नुकतंच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी एक रिल शेअर केली आहे. त्या व्हिडीओला त्यांनी “कपल गोल्स, तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा एक महत्वाचा भाग आहे. फक्त चांगले बनण्याचा प्रयत्न करा. नेहमीच एकमेकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. मनातली गोष्ट शेअर करा. बोलून मोकळे व्हा.. एकमेकांचे मित्र व्हा.. मित्राल कायमच कोणत्याही परिस्थितीत साथ द्या… तुम्ही पती आहात की पत्नी हे महत्त्वाचे नाही. आयुष्य तुम्हाला नक्कीच सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल. प्रयत्न करून पाहा.” (Social Media)

युजर्सने त्या व्हिडीओच्या माध्यमातून ऐश्वर्या आणि अविनाश यांना संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने त्यांना म्हातारचळ लागलेले आईबाबा अशी कमेंट केली होती. यावर ऐश्वर्या नारकर यांनी, “बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलण्यात सगळंच राहून जाईल.. म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे त्यांनी हसण्याचा इमोजी सुद्धा दिला आहे.

दोघांच्याही कामाविषयी सांगायचे तर, ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. तर अविनाश नारकर सध्या ‘कन्यादान’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : धारावी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच आंदोलन

Maratha Reservation: मोठी घोषणा! लवकरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार!

Sage Soyare Ordinance: मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, चंद्रकात पाटील यांची माहिती

Mahadev Jankar Video: महादेव जानकरांची मोठी घोषणा; पुढची लोकसभा बारामतीतून लढणार!

Vitthal Maharaj Shastri Prediction : देवेंद्र फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांची मोठी भविष्याणी

SCROLL FOR NEXT