Vidya Balan Reel Viral Mimicking Bhau Kadam Instagram
मनोरंजन बातम्या

Vidya Balan Funny Video: कुशलनंतर भाऊ कदमचीही विद्या बालनला भुरळ, ‘ऐका हो ऐका’ म्हणत भन्नाट Video शेअर

Vidya Balan Shared Bhau Kadam Video: कॉमेडीस्टार आणि अभिनेता भाऊ कदमची भुरळ अभिनेत्री विद्या बालनला सुद्धा पडली आहे.

Chetan Bodke

Vidya Balan Reel Viral Mimicking Bhau Kadam

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘नीयत’ आणि ‘शकुंतला देवी’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. कायमच आपल्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत राहणारी विद्या बालन सध्या एका रीलमुळे चर्चेत आहे.

महाराष्ट्रामध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा चाहतावर्ग फार मोठा आहे. या कॉमेडी शोने आपल्या उत्तम कॉमेडीमुळे फक्त मराठी सेलिब्रिटींनाच नाही तर, बॉलिवूड सेलिब्रिटींनाही भूरळ घातली आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

शोप्रमाणेच त्यातील कलाकारही कायमच चर्चेत राहतात. कॉमेडीस्टार आणि अभिनेता भाऊ कदमची भुरळ अभिनेत्री विद्या बालनला सुद्धा पडली आहे.

विद्या बालन जरी रुपेरी पडद्यावर गंभीर पात्र साकारत असली तरी, ती रियल लाईफमध्ये खूपच मजेशीर आणि विनोदी व्यक्ती आहे. अनेकदा तिचा स्वभाव आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून दिसतो. कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारी विद्या बालनने नुकतीच एक मराठी भाषेतील रील शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने भाऊ कदमची नक्कल केली आहे.

भाऊ कदमची नक्कल केलेली व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ कदम ‘सिगारेट ओढता का, दारु पिता का…’ असे वाक्य बोलताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा रील शेअर करताना ‘ऐका हो ऐका’ असं कॅप्शन देत शेअर केलं आहे. (Viral Video)

विद्या बालनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही फार मजेशी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी म्हणतात, ‘कडक आहात तुम्ही बाई, मजाच आली’, ‘मस्त विद्या मॅडम’, ‘एवढी क्युट का आहेस तू’, ‘जबरदस्त...’, ‘मॅम मराठी लय भारी’ अशा अनेक मराठीमध्ये कमेंट विद्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विद्या बालनने पहिल्यांदाच मराठीमध्ये बोलणारी व्हिडीओ शेअर केलेली नाही, यापूर्वी ही तिने ‘चला हवा येऊ द्या’ मधील एका स्कीटचा रील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओत तिने कुशल बद्रिकेची नक्कल केली होती. (Social Media)

दरम्यान, विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचे तर, तिने आतापर्यंत अनेक हिट आणि दमदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. तिने जरी आतापर्यंत गंभीर पात्र साकारले असले तरी, त्यातून तिने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहेत. ‘द डर्टी पिक्चर’ मुळे विद्याला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘परिणीता’, ‘शकुंतला देवी’, ‘तुम्हारी सुलू’, ‘भूल भूलैय्या’, ‘मिशन मंगल’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘नीयत’, ‘बेगम जान’, ‘किस्मत कनेक्शन’सारख्या हिट चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT