Pushpa 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

'पुष्पा' पुन्हा धुमाकूळ घालणार; श्रीवल्लीचं काय होणार? निर्मात्यांनी दिली नवी अपडेट

'पुष्पा द राइज' हा चित्रपट तिकीटबारीवर जबरा हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. या चित्रपटाची जादू अवघ्या देशभरात पाहायला मिळाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) यांचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट तिकीटबारीवर जबरा हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. या चित्रपटाची जादू अवघ्या देशभरात पाहायला मिळाली. चित्रपटातील गाणी, अल्लूची स्टाइल, त्याचे डायलॉग यांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा भाग येईल अशी चर्चा सुरू झाली अन् चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. दुसरा भाग कसा असेल, त्याचे कथानक काय असेल याबाबत उत्सुकता असतानाच, आता या चित्रपटाविषयी नवी अपडेट समोर आली आहे.

रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या सुपरहिट 'पुष्पा' चित्रपटाच्या प्रंचड यशानंतर अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. आता चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. त्यामुळे हा दुसरा भाग कसा असेल, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

'पुष्पा द राइज' चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या केमिस्ट्रीने तर प्रेक्षकांना भारावून सोडले. अल्लू अर्जुनचा हटके अंदाज सर्वांनाच भावला. माहितीनुसार, सध्या 'पुष्पा २' चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कोण कलाकार असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदाना हे कलाकार असणार आहेत. याव्यतिरिक्त विजय सेतुपती हा देखील भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी हा देखील या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्माते त्याच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मनोज वाजपेयीसारखा कसलेला कलाकार या चित्रपटात काम करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अलीकडेच, चित्रपटाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. 'पुष्पा २' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील कथानकात श्रीवल्लीचा मुत्यू होणार असल्याची चर्चा झाली होती. मात्र, दुसऱ्या भागात असं काही होणार नसल्याचं निर्मात्यांनी अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

चित्रपटाची कथा ही आधीपेक्षा खूपच वेगळी असेल. चित्रपटात ड्रामा, अॅक्शन-थ्रिल बघायला मिळेल. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार बंदरेड्डी आहेत. 'पुष्पा २' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचा नवीन सिक्वेल कसा असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

SCROLL FOR NEXT