Yo Yo Honey Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh Life Threat : सलमान खाननंतर बिश्नोई गँगची हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?

Honey Singh In Trouble : कॅनडामध्ये असलेला गँगस्टर गोल्डी ब्रारने धमकीची व्हॉईस नोट पाठवली आहे.

Pooja Dange

Bishnoi Gang Threaten Honey Singh : प्रसिद्ध गायक हनी सिंगच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. कॅनडामध्ये असलेला गँगस्टर गोल्डी ब्रारने धमकीची व्हॉईस नोट पाठवली आहे. धमकी मिळताच सिंगरने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली आहे.

मृत्यूची भीती वाटत असल्याचं हनी सिंगने दिल्ली पोलिसांना सांगितलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूप्रकरणी गोल्डी ब्रार मुख्य आरोपी असून त्याने काही महिन्यांपूर्वी सलमान खानला धमकीचा ईमेलही पाठवला होता, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. (Latest Entertainment News)

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनेडियन गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर हनी सिंगने बुधवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गायकाला व्हॉईस नोट्सद्वारे धमक्या मिळाल्याचे वृत्त आहे. 21 जून रोजी सिंगर स्वत: दिल्ली पोलिस मुख्यालयात जाऊन आयुक्तांची भेट घेतली आणि तक्रार दाखल केली.

हनी सिंगने सांगितले की, 'मी अमेरिकेत होतो आणि माझ्या मॅनेजरला धमकीचा फोन आला. मलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आलाय आहे. मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली आहे.

चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित विशेष सेल याकडे लक्ष देईल असे त्यांनी सांगितले. माझ्याकडे जी काही माहिती होती ती मी त्यांना दिली. त्यांनी सर्व काही तपशीलवार नोंदवले. जोपर्यंत तपास सुरू होत नाही, तोपर्यंत जास्त काही सांगू नका, असे हनी सिंगला सांगितले.

हनी सिंग म्हणाला, 'माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले आहे. लोकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि पहिल्यांदाच अशी धमकी आली आहे. मला खूप भीती वाटत आहे. संपूर्ण कुटुंब घाबरले आहे. मृत्यूला कोण घाबरत नाही? मला आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत होती, ती म्हणजे मृत्यूची.

गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. तो सध्या फरार आहे. कॅनडाच्या सरकारने मे 2023 पासून देशातील टॉप 25 वाँटेड गुन्हेगारांमध्ये गोल्डीचा समावेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT