मुंबई : 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' नंतर अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे. 'इमर्जन्सी'(Emergency) या चित्रपटातील भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेसोबतच कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. अलीकडेच, कंगनाने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज केल्यानंतर या चित्रपटाविषयी खुलेपणाने आपले मत मांडले आहे. हा चित्रपट तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असेल असे ती म्हणाली.
कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकला नाही. मात्र, कंगना पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये पूर्ण उत्साहाने काम करताना दिसत आहे. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'नंतर ती दुसऱ्यांदा 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
अलिकडेच, एएनआयसोबत झालेल्या एका मुलाखतीत, कंगनाने दुसऱ्यांदा चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल सांगितले. 'मी सुरू केलेल्या गोष्टी आता पॉप कल्चरचा एक भाग बनत आहेत. मला विश्वास आहे की प्रेक्षक अशा चित्रपटांच्या शोधात आहेत जे त्यांना मानसिकदृष्ट्या जागृत ठेवतील'. असे ती मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणाली.
कंगना पुढे म्हणाली, 'मी दिग्दर्शित केलेल्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते. पण माझ्याकडे अभिनयाच्या अनेक असाइनमेंट बाकी होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतर मी या चित्रपटावर काम करणे सुरु केले. मला अस वाटते की मी प्रेक्षकांची आवड समजू शकते'.
'इमर्जन्सी हा अलिकडच्या इतिहासातील एक असा अध्याय आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. मला वाटते की प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहे. त्यातून प्रेक्षकांना काय हवे आहे हे समजते. निर्मात्यांना नवीन कल्पना, नवीन गोष्ट पाहायच्या असतात आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझ्या विचारसरणीचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. असे कंगना मुलाखतीच्या शेवटी म्हणाली.
'इमर्जन्सी' हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. इमर्जन्सी आणि ऑपरेशन ब्लू स्टारची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.