Dharmendra Share Emotional Post Instagram @aapkadharam
मनोरंजन बातम्या

Dharmendra Share Emotional Post : करण देओलच्या लग्नानंतर धर्मेंद्रनी हेमा-ईशाची मागितली माफी ; शेअर केली भावनिक पोस्ट

Dharmendra Express His Unconditional Love : धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी आणि मुली ईशा देओल आणि आहाना देओलसाठी ही पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Dharmendra Wrote Special Note For Hema, Isha, Ahana : बॉलिवूडचे डॅशिंग अभिनेते धर्मेंद्र ८७ व्या वर्षी देखील त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र त्यांचे अपडेट्स देत असतात. दरम्यान त्यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते थोडे भावूक झाल्याचे दिसत आहेत.

धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी आणि मुली ईशा देओल आणि आहाना देओलसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली आणि पश्चाताप होत असल्याचे सांगितले. मात्र, त्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. (Latest Entertainment News)

धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी ईशा देओलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघे एकत्र बसून हसताना दिसत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये धर्मेंद्र यांनी लिहिले आहे, "आयशा, अहाना, हेमा आणि माझी सर्व प्रिय मुले... तख्तानी आणि वोहरा तुम्हा सर्वांवर मी मनापासून प्रेम करतो आणि तुमचा आदर करतो... वय आणि आजारपण मला सांगत आहे की मी तुमच्याशी पर्सनली बोलयला हवं होत... पण."

धर्मेंद्र नुकतेच नातू करण देओलच्या लग्न आणि रिसेप्शनमध्ये दिसले होते. धर्मेंद्र यांनी लग्नसमारंभामध्ये डान्स करत एन्जॉय देखील केले आणि त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. करण देओलच्या लग्नाला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते, मात्र हेमा मालिनी, ईशा देओल आणि अहाना देओल लग्नाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसल्या नाहीत.

धर्मेंद्रच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच रॉकी ओर रानी की प्रेमकथेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चन आणि शबाना आझमी यांचाही समावेश आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेत आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित बनला आहे.

रॉकी ओर रानी की प्रेमकथा 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय धर्मेंद्र 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'अपने'च्या सिक्वेल असलेल्या 'अपने 2'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्रसोबत सनी देओल आणि बॉबी देओलही या चित्रपटामध्ये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

SCROLL FOR NEXT