kannada actor harish passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघातात निधन; वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Death: १२ एप्रिल हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद ठरला. एका बाजूला, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. तर दुसऱ्या बाजूला, एका प्रसिद्ध अभिनेत्याला वयाच्या ४० व्या वर्षी आपला जीव गमवावा लागला.

Shruti Vilas Kadam

Actor Death: काल दुपारी आलेल्या दुःखद बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्रज्ञी आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या बातमीसह आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील केजीएफ फेम प्रसिद्ध कन्नड अभिनेता हरीश याचे एका भीषण अपघातात निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास या घटनेमुळे संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील कुशालनगर तालुक्यात घडला. ४० वर्षीय हरीश हा रात्री उशिरा आपलं काम संपवून कुशालनगरहून होसाकोटे येथील आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग २७५ वर एका वनक्षेत्राजवळ त्याच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात हरीशला गंभीर दुखापती झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या अपघाताबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कार टँकरला नेमकी कशी धडकली याचा सखोल तपास सुरू आहे.

हरीश हा कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. विशेषतः खलनायक भूमिका साकारण्यात त्याची खास शैली होती. यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असे. त्याच्या या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून हरिशला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT