Fahadh Faasil New Look In Pushpa 2 Saam TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Poster: अल्लू अर्जुननंतर फहाद फासिलचा पहिला लूक आऊट; 'भंवर सिंग शेखावत'चा खतरनाक अंदाज

Fahadh Faasil New Look From Pushpa 2 Movie: पुष्पाचा सर्वात मोठा शत्रू भंवर सिंग म्हणजेच फहद फासिलचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

Pooja Dange

Fahadh Faasil New Look Out From Pushpa 2 Movie:

अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस भरघोस कमाई केली होती. हा चित्रपट कोरोनानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाचा भरपूर आनंद लुटला. चित्रपटाला २ वर्ष पूर्ण होत अली आहेत तरीही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

लोक अजूनही पुष्पाचा लूक आणि डायलॉग्स रिपीट करताना दिसतात. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या जोडी अनेक चित्रपटातील हिट जोड्यांना मागे टाकले.

आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी पुष्पाचा सर्वात मोठा शत्रू भंवर सिंग म्हणजेच फहद फासिलचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

पुष्पा चित्रपट आधी दक्षिण भारतात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो पॅन इंडिया प्रदर्शित करण्यात आला. जेव्हा निर्मात्यांनी 'पुष्पा 2'ची घोषणा केली तेव्हा निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक होते आणि प्रेक्षक तो पाहण्यासाठी उत्सुक होते.

काही काळापूर्वी पुष्पराजचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता, ज्यामध्ये अल्लू अर्जुन एका बंगल्या अंदाजात दिसला होता. त्यानंतर पुष्पाचा टीझर रिलीज झाला ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा दमदार अवतार दिसला. आता निर्मात्यांनी फहाद फासिलचा नवीन लूक त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.

फहद हा पुष्पा - द राइजचा भाग आहे, त्याने चित्रपटामध्ये पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या पात्राला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आणि आता घेऊन तो 'पुष्पा-2'मध्ये पुनरागमन करत आहे. IPS अधिकारी भंवर सिंह शेखावत उर्फ ​​फहाद फासिलचा पुष्पा-2 मधील लूक खूपच भयानक आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागातील त्याच्या पहिल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी त्याला सिगार ओढताना दाखवले आहे.

फहाद फासिलचे हे पोस्टर शेअर करताना, पुष्पा 2 च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले, 'पुष्पा 2 - द रुल'ची संपूर्ण टीममधील मल्टीटॅलेंटेड अभिनेता फहाद फासिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'

फहद फासिलच्या या इंटिमेट लूकवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. भंवर सिंगची ही अनोखी स्टाइल चाहत्यांना आवडली आहे.

'पुष्पा 2'मधील फहाद फासिलचा हा लूक शाहरुख खानच्या 'जवान'मधील लूकची आठवण करून देत आहे. टक्कल, मिशा आणि सनग्लासेस फहाद आणि शाहरुखसारखा दिसत आहे.

सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहेत.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना देखील 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 च्या नवीन शेड्यूलचे शूटिंग सुरू केले आहे. सध्या तो हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT