Munjya Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munjya Twitter Review : साधे सरळ कथानक आणि उत्तम मांडणी..., शर्वरी वाघचा 'मुंज्या' हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला ?

Munjya Review : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असणारा 'मुंज्या' चित्रपट चाहत्यांना कसा वाटला, त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळाला आहे, जाणून घेऊया...

Chetan Bodke

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झालेला आहे. टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. अशातच आज चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून या चित्रपटामध्ये मराठमोळी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी असणारा 'मुंज्या' चित्रपट चाहत्यांना कसा वाटला, त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळाला आहे, जाणून घेऊया...

चित्रपटाचा फर्स्ट शो अनेक ठिकाणी मध्यरात्री होता. मध्यरात्री ही चाहत्यांना दमदार उपस्थिती लावलेली होती. अनेकांनी या चित्रपटाची तुलना वरूण धवनच्या 'भेडिया' चित्रपटासोबत केलेली आहे. एक युजर म्हणतो, "अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम चित्रपट आहे. ट्रेलर तर पाहिला नव्हता, पण खूप दमदार कथानक आहे.", तर आणखी एक युजर म्हणतो, "साधे सरळ कथानक, उत्तम मांडणी असणारा हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. दिग्दर्शकांसह कलाकारांनी उत्तमपणे चित्रपट साकारला आहे. इंटर्व्हलच्या आधी उत्तम कथानक आहे आणि इंटर्व्हलनंतर कथा संदर्भाच्या बाहेर असली तरी चित्रपट पाहायला मज्जा येते. "

तर आणखी एक युजर म्हणतो, "चित्रपटाची खूप वाट पाहत होतो. हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये दमदार स्टारकास्ट असून कथा आणि व्हिएफएक्स खूप उत्तम आहे.", "मध्यरात्री चित्रपट पाहतोय, हाऊसफुल्ल शो आहे, ओपनिंग सीन मस्त आहेत." मुंज्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये आणि शर्वरी वाघ हे मराठमोळे सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत आहेत.. या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT