Ananya Panday-Aditya Roy Kapur Saam TV
मनोरंजन बातम्या

Aditya Roy Kapur- Ananya Panday : अनन्या- आदित्य परदेशात झाले रोमँटिक; गुपचूप आनंद लुटतानाचे Photo Viral

Aditya Roy Kapur- Ananya Panday Spotted Together : लिस्बनमधील अनन्या आणि आदित्यचे फोटो समोर आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditya Roy Kapur- Ananya Panday Photos Goes Viral : अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आदित्य रॉय कपूरला बॉलिवूडमधील लव्हर बॉय म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपासून या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अशातच हे दोघेही एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना आणखीनच जोर आला आहे.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दलच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा देखील केलेली नाही.

गेल्या वर्षी क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसल्यापासून त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना सुरूवात झाली. दरम्यान, ११ जुलैला दोघांनीही स्पेनमधील रॉक कॉन्सर्टमधील फोटो शेअर केले होते. फोटो शेअर केल्यापासून त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

१२ जुलैला लिस्बनमधील अनन्या आणि आदित्यचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत हे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. लिस्बनमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे दोघेही स्कायलाइनवर निसर्गाचा आनंद घेताना दिसले.

पोर्तुगलमध्ये असताना दोघांनी काही चाहत्यांसोबत फोटोही काढले आहेत. यावेळी अनन्याने काळ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे. तर आदित्य रॉय कपूरने राखाडी टी-शर्टमध्ये काळ्या रंगाच्या शॉर्ट्स परिधान केले आहे.

दरम्यान, अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती स्पेनमध्ये आर्क्टिक माकडांसोबत धम्माल करताना दिसली. तर दुसरीकडे, आदित्य रॉय कपूरने देखील तसाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोंमुळे आदित्य आणि अनन्या एकत्र असल्याचा अंदाच नेटकऱ्यांनी वर्तवला होता.

आदित्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, आदित्य रॉय कपूर 'द नाईट मॅनेजर' या वेबसीरिजमध्ये झळकला होता. तर अनन्याचा 'ड्रिम गर्ल २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT