Aditya Narayan Instagram
मनोरंजन बातम्या

आदित्य नारायणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; घरात आनंदाचं वातावरण

श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईतील एका नर्सिंग होममध्ये बाळाला जन्म दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गायक आणि टीव्ही शो होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आदित्यने इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करत याबाबद माहिती दिली आहे. श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईतील एका नर्सिंग होममध्ये मुलीला जन्म दिला.

गायक-अभिनेता आदित्य नारायने सांगितले की, मी मुलगी होण्यासाठी प्रार्थना करत होतो आणि त्याची प्रार्थना स्वीकारली गेली आहे. आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने घरत आनंदाचे वातावरण आहे. मला विश्वास आहे की वडील त्यांच्या मुलींच्या सर्वात जवळ असतात आणि मला आनंद आहे की मला एक सुंदर अशी मुलगी झाली.

आदित्य म्हणाला की, त्याच्या मनात श्वेताबद्दलचा आदर आणखीनच वाढला. पुढे आदित्य म्हणाले की, बाळाचा जन्म झाला तेव्हा मी श्वेतासोबत होतो, मला वाटतं फक्त एका स्त्रीमध्येच मुलाला जन्म देण्याची एवढी ताकद आणि क्षमता आहे. जेव्हा एखादी स्त्री मुलाला जन्म देते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT