Adipurush team decided to dedicate 1 seat on every screen in the theatre for lord hanuman  Twitter @PrabhasRaju
मनोरंजन बातम्या

Adipurush Makers Big Decision : थिएटरमध्ये हनुमानसोबत पाहता येणार आदिपुरुष चित्रपट; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Watch Adipurush With Lord Hanuman: आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक सीट राखीव ठेवण्यात येणार आहे.

Pooja Dange

Adipurush Team Decide To Keep 1 Seat Empty In All Theatres : प्रभासचा आणि करिती सेननचा आगामी चित्रपट आदिपुरुष 2023 मधील बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन आठवडेचा बाकी आहेत. दरम्यान निर्मात्यांनी प्रमोशनच्या अंतिम टप्प्याला सुरुवात केली आहे.

नुकतीच आदिपुरुष टीमने रिलीज संदर्भात एक घोषणा केली. आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक सीट राखीव ठेवण्यात येणार आहे. हे राखीव आसन हनुमानाला समर्पित करण्यात येईल.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट हनुमानाला समर्पित केली जाईल. प्रत्येक स्क्रीनिंगमध्ये, एक सीट रिकामी ठेवण्यात येईल.

आदिपुरुषच्या टीमने शेअर केलेल्या स्टेटमेंट म्हटले आहे की, "जिथे रामायणाचे पठण केले जाते तेथे भगवान हनुमान दिसतात. अशी आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर करून, प्रभासचा राम-स्टार आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा तिकीट विकत न घेता राखून ठेवण्यात येईल.

रामाच्या या महान भक्ताला आदरांजली अर्पण करण्यामागचा इतिहास जाणून घ्या. आम्ही हे महान कार्य अज्ञात मार्गाने सुरू केले आहे. आपण सर्वांनी भगवान हनुमानाच्या सान्निध्यात आदिपुरुषाने केलेल्या हे महान कार्य पहावे."

आदिपुरुष हा भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत, तर सनी सिंग आणि देवदत्त नागे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

500 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक वादांमध्ये अडकला होता. सैफ अली खानच्या 'रावण इज ह्युमन' या कमेंटपासून ते वाईट VFX मुळे आदिपुरुष चित्रपट ट्रोल झाला होता. हा चित्रपट आता जगभरातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच जवळपास 432 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे म्युजिक राईट्स आणि डिजिटल स्ट्रिमिंग राईट्स विकून चित्रपटाने इतके कलेक्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT