Makers Spent 2 Crore Rupees For Promotion In Adipurush Instagram/ @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Pre Release Event: चित्रपट हिट करण्यासाठी निर्मात्यांनी केला मास्टरप्लॅन, ओतणार पाण्यासारखा पैसा...

Makers Spent 2 Crore Rupees For Promotion In Adipurush: मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी चित्रपट हिट होण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.

Chetan Bodke

Adipurush Pre-Release Event Unique And Expensive: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रभास आणि क्रिती सेनन प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ६०० कोटी इतका पैसा खर्च केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे १५ दिवसच उरले असून चित्रपट किती कमाई करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत चित्रपट हिट होण्यासाठी निर्माते कोणतीच कसर सोडू इच्छित नाहीत. मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी चित्रपट हिट होण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते चित्रपटाच्या प्री-इव्हेंटसाठी तब्बल २ कोटी रुपये इतका खर्च करणार आहेत. चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन व्हावे, यासाठी ही मोठी रक्कम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रमोशन कार्यक्रम आणखी खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी फटाके फोडण्याची व्यवस्था केली असून त्यासाठी स्पेशल ५० लाख रूपये खर्च करणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरीला १७० कोटींना विकले आहेत. म्हणजेच, चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १७० कोटींची कमाई केली आहे. अद्याप तरी, हिंदी शिवाय दुसऱ्या कोणत्या भाषेत चित्रपटाचे राईट्स विकल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटाने भरघोस कमाई केल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

‘आदिपुरूष’ चित्रपटात प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली असून क्रिती सेननने माता सीतेची भूमिका साकारली आहे. तर सैफने रावणाची भूमिका साकारली असून मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतकडे आहे. चित्रपटाच्या अनेक पोस्टर्ससोबतच चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोबतच महत्वाची बाब म्हणजे चित्रपटातील गाणे देखील प्रदर्शित झाले असून गाण्यांची देखील सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होत असून चित्रपटाला प्रेक्षकाला किती प्रतिसाद देणार हे येता काळच सांगेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Kalyan Tragedy: तो व्हिडिओ अखेरचा ठरला; काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Breakup: ब्रेकअपमुळे दु:ख नाही तर होतो फायदा; शिकायला मिळतात आयुष्याचे ५ महत्त्वाचे धडे

Maharashtra Live News Update: नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू होणार

SCROLL FOR NEXT