Aadipurush Poster  Instagram/ @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Poster Lands In Trouble: चित्रपटातील वाद आणखी शिगेला?, नेटकऱ्यांनी पोस्टरमधील चुका दाखवत केले पुन्हा ट्रोल

प्रदर्शनापुर्वी पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’ चित्रपट अडचणीत सापडला आहे.

Chetan Bodke

Adipurush Film Trolled: प्रदर्शनापुर्वी पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’ चित्रपट अडचणीत सापडला आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ते आता पुन्हा एकदा वादात सापडले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार आणि कलाकारांच्या नावे मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःला सनातन धर्माचा प्रचारक म्हणवणारे संजय दीनानाथ तिवारी यांनी ही तक्रार केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावले गेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

आदिपुरुषच्या नव्या पोस्टरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केले आहे की, चित्रपट निर्मात्याने ‘रामचरितमानस’ या हिंदी धार्मिक पुस्तकातील पात्राचे अयोग्य चित्रण केले आहे. ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हिंदू धर्मीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (A), 298, 500, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात यावी या मागणीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोबतच, पोस्टरमध्ये क्रिती सेननला सिंधूर नसलेली अविवाहित स्त्री दाखवण्यात आली आहे. यावरून तिला अविवाहित महिला म्हणून दाखवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. असे करत ते सनातन धर्माचा अपमान करत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. आदिपुरुषच्या पोस्टरमध्ये हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात भारतातील विविध राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो.

नुकतेच आदिपुरुषचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे. पोस्टरने चाहत्यांना फारसे प्रभावित केले नाही. युजर्सने पोस्टरवरुन निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची खिल्ली उडवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

Afghani Suit Designs: डेली वेअरसाठी 'हे' अफगाणी सूट आहेत बेस्ट चॉईस, एकदा नक्की ट्राय करा

Maharashtra Politics : अजित पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Vishalgad Fort History: सह्याद्रीतील प्राचीन गड, जाणून घ्या विशालगड किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

SCROLL FOR NEXT