Adipurush trailer  Instagram @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Adipurush Collection : आदिपुरुषची रिलीजआधीच कोटीच्या कोटी उड्डाणे.. प्रदर्शनाधीच चित्रपटाची ४३२ कोटीची कमाई

Adipurush Movie Collection : 500 कोटी रुपयांच्या अहवालातील बजेटपैकी 432 कोटी रुपये वसूल केले आहेत.

Pooja Dange

Adipurush Producer Sold Rights: साऊथ सुपरस्टार प्रभास ओम राऊतच्या आदिपुरुषमध्ये रामाची भूमिका साकारत आहे. क्रिती सेनन देवी सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला चित्रपटाचा टीझर रिलीज होताच वादाला सुरुवात झाली होती.

व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकमुळे चित्रपटाला खूप ट्रोल करण्यात आला होते. त्यानंतर टी-सीरीज आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाने रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

आदिपुरुषच्या प्रदर्शनाला दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे, असे असताना या बिग बजेट चित्रपटाबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Latest Entertainment News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषने रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा कमावला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांवर चित्रपटाच्या यशाचे दडपण काही प्रमाणात कमी असेल.

बॉलीवूड हंगामामधील एका अहवालानुसार, शुक्रवारी, 16 जून रोजी थिएटरमध्ये येण्यापूर्वीच आदिपुरुषने चित्रपटाच्या बजेटच्या सुमारे 85 टक्के वसूल केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे. 500 कोटी रुपयांच्या अहवालातील बजेटपैकी 432 कोटी रुपये वसूल केले आहेत.

आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतकी कमाई कशी झाली असा प्रश्न अनेकांना पडला असेल? तर ओम राऊत दिग्दर्शित हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित चित्रपटाचे संगीत अधिकार आणि इतर अधिकारांसह डिजिटल अधिकार विकून चित्रपटाने 432 कोटी कमावले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

यासह प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या या पौराणिक चित्रपटाने केवळ साऊथमधून 185 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यांचा विचार करता, T-Series च्या आगामी चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच रु. 432 कोटी, म्हणजे रु. 500 कोटी बजेटपैकी 86.4% कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : यंदा नवरात्र १० दिवसांची, देवीचे आगमन हत्तीवर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Royal Enfield Meteor 350: दमदार फिचर्स अन् जबरदस्त इंजिन, रॉयल एनफील्ड 'Meteor 350' चा नवा लूक, जाणून घ्या नवीन किंमत

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

SCROLL FOR NEXT