Adipurush Film Fans Reaction Twitetr
मनोरंजन बातम्या

Adipurush Film Fans Reaction: पब्लिकचा नादच न्हाय! 'आदिपुरूष'ला भंगार म्हणाला, पडेपर्यंत तुडवला; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: अनेकदा ट्रोल झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.

Chetan Bodke

Adipurush Film Fans Reaction: ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर आज तो क्षण अखेर आला. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे. प्रभासच्या अनेक चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो चित्रपट पाहिला.

टीझर प्रदर्शित झाल्यापासून कायम चर्चेत राहिलेल्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा होत्या. अनेकदा ट्रोल झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. अनेकांनी चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर टीका केली तर इतरांनी चित्रपटाची प्रशंसा केली. अशातच एक हैदराबादमध्ये चित्रपटावरून एक वाद होण्याची शक्यता आहे. तेथील एक वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Bollywood Actor)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक चाहता प्रसाद आयमॅक्सच्या बाहेर जमलेल्या पत्रकारांशी एक प्रेक्षक संवाद साधत होता. त्याला पत्रकारांनी चित्रपट कसा वाटला? असा प्रश्न विचारला. त्याने दिलेलं उत्तर ऐकून प्रभासच्या चाहत्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना तो म्हणतो, “त्यांनी प्ले स्टेशन गेममधील सर्व राक्षसांना उचलून या चित्रपटात टाकलंय. हनुमान, बॅकग्राउंड स्कोअर आणि काही थ्रीडी शॉट्स सोडले तर चित्रपटात पाहण्यासारख दुसरं काहीही नाही.”

जेव्हा त्याला प्रभासबद्दल विचारले तेव्हा तो म्हणतो, प्रभासला चित्रपटात राघवची भूमिका शोभून दिसत नाही. तो अजूनही चित्रपटात बाहूबलीतल्या राजासारखाच दिसतोय. दिग्दर्शकांना प्रभासला इतक्या खास पद्धतीने दाखवायला जमले नाही. तो चित्रपटाबद्दल आपली भूमिका मांडत असताना तिथल्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. आणि मारायला सुरूवात केली. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Bollywood Film)

ही व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या व्यक्तीला मारहाण करण्याचा अधिकार नाही. असं म्हणाले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर जवळपास ५०० कोटींचा खर्च केलाय. इतका खर्च केला असला तरी, चाहते चित्रपटावर नाराज आहे. चित्रपट 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित झालेला आहे. क्रिती आणि प्रभास मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट पहिल्या दिवशी १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ड्रोन लाईट शोद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळणार पुण्याचे आकाश

Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

Nepal Protest: नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर आंदोलकांचा हल्ला; अनेकजण जखमी

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

Hingoli Rain: हिंगोलीत मुसळधार पावसामुळे हळद पिक पाण्याखाली; बळीराजा संकटात|VIDEO

SCROLL FOR NEXT